

सफाळे ः चर्चगेट ते डहाणू हा उपनगरीय क्षेत्र म्हणून कार्यान्वित आहे आणि त्यादृष्टीने विरार नंतर डहाणू पर्यंत लोकलच्या दिवसभरात किती फेऱ्या होणे अपेक्षित असतात हा गांभीर्याने विचार करणारा प्रश्न आहे. तथापि विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत किमान दिवसभरात अप-डाऊन अशा 50 फेऱ्या तरी होणे आवश्यक आहेत.
मुंबई पासून अगदी शेजारी म्हणजे विरार नंतर डहाणू पर्यंत उपनगरीय क्षेत्र म्हणून 1995 ला घोषित होऊन प्रत्यक्षात विरार नंतर डहाणू लोकल 2013 ला सुरू झाली. सुरवातीला डहाणू लोकलच्या दिवसभरात 10 अप 10 डाऊन अशा फेऱ्या सुरू झाल्या आणि कालांतराने ह्या फेऱ्या वाढत जाऊन आजच्या घडीला 21 अप 21 डाऊन अशा फेऱ्या होत आहेत, तथापि मागील 10 वर्षात डहाणू विभागात नागरिकरण खूप वाढले आहे, तसेच औद्योगिकरणाच्या दृष्टीने ठाणे, भिवंडी,पनवेल ते थेट घोलवड पर्यंतचे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून डहाणू विभागात लोकल, मेमू आणि शटल गाड्यांच्या फेऱ्या वाढणे आवश्यक आहेत.
वैतरणा स्थानकात मुंबई नंदुरबार पॅसेंजर या गाडीला थांबा मिळावा.
वैतरणा रेल्वे स्थानक हे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात असुन विरार पासुन अवघ्या 7 किमी अंतरावर असून ह्या स्थानकातून रोज 18 ते 20 गावातील स्थानिक नागरीक प्रवास करत असतात.ह्या स्थानकात रात्री दुसऱ्या पाळीतुन घरी येणाऱ्या नोकरदार प्रवाशांना रात्री विरार येथून 10:50 ला सुटणारी 09083 विरार-डहाणू मेमू गेल्यानतंर 19425-26 मुंबई नंदुरबार पसेजर ही गाडी आहे.परंतु ही गाडी वतैरणा स्थानकात अनेक वर्षा पासून थांबत नाही तरी ह्या 19425-26 ह्या गाडीला अप-डाऊन दोन्हीही दिशेने थांबा देण्यात यावा अशी विनंती.
पालघर-ठाणे जिल्हा रेल्वेने जोडावा
पालघर आणि ठाणे पूर्वी एकत्रित जिल्हा होता तेव्हा सुद्धा जिल्ह्यात रेल्वे सेवा उपलब्ध नव्हती अपेक्षा आहे पालघर जिल्ह्या ठाणे जिल्ह्या जोडण्यासाठी/ जाण्यासाठी आणि भिवंडी औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या येणाऱ्या कामगार वर्गासाठी आणि सामान्य नागरिक प्रवाशांच्या सोयीसाठी डहाणू ते ठाणे, भिवंडी अशा मेमू सेवा सुरू करण्यात याव्यात ज्या वाया वसई भिवंडी मार्गे धावू शकतील.