

रोहे : रोहा अष्टमी परिषद सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी चांगलीच तापल्याचे दिसून आले आहे.निवडणूक प्रक्रियेमध्ये अंतिम टप्प्यातील प्रक्रिया असलेल्या मतदान आज होत असून या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासन यंत्रणा तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
रोहा अष्टमी नगर परिषदेत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी होत असताना राजकीय तर्क वितर्क वर्तवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) म्हणजेच खा. सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला रोहा तालुका ओळखला जातो. त्या बालेकिल्ले शिवसेना ( शिंदे गट ) ने आव्हान दिल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार असे बोलले जात असताना त्याच पद्धतीने दोन्ही बाजूने प्रचार यंत्रणा राबवले गेले आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात त्यांचा कौल आज मतपेटीत बंदिस्त होणार आहे.
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट) चे राजेंद्र जैन बिनविरोध आल्यानंतर उर्वरित रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या 19 जागेसाठी विविध पक्षाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना ( शिंदे गट ) 13, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) 19, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी 5, शिवसेना ( उबाठा ) 4, भारतीय जनता पार्टी 3, अपक्ष 6 हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंदिस्त होणार आहेत.
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 17669 मतदार आहेत. यामध्ये 8641 पुरुष व 9028 महिला मतदार आहेत. या मतदारांच्या हाती रोहा अष्टमी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारांचे भवितव्य आहेरोहयात राष्ट्रवादी ( अजित पवार गट) विरुद्ध एकत्रीत शिवसेना ( शिंदे गट ), शिवसेना ( उबाठा ) भाजप असे लढत असून काँग्रेस मात्र स्वतंत्र लढत आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या ( अजित पवार गट) वनश्री शेडगे विरुद्ध ( शिवसेना शिंदे गट ) च्या शिल्पा धोत्रे अशी लढत आहे. ही लढत काटे की टक्कर होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.
मतदानासाठी 20 केंद्र तयार
रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीत मतदानासाठी 20 केंद्र तयार करण्यात आले आहेत. मतमोजणी ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे होणार आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किशोर देशमुख, निवडणूक सहाय्यक अधिकारी तथा मुख्याधिकारी अजयकुमार एडके, नायब तहसीलदार राजेश थोरे, नायब तहसीलदार मोकल, नगरपरिषदेचे निवास पाटील यांच्यासह 140 अधिकारी, कर्मचारी निवडणुकीचे काम पाहत आहेत.
10 पोलिस राखीव
निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाले असून पोलीस उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 9 अधिकारी, 56 पोलीस आमदार, एक पथक (15 जवान) व 40 होमगार्ड तैनात करण्यात आले असून या निवडणुकीसाठी 10 पोलिस राखीव ठेवण्यात आले आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
रोह्यात नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) विरोधात शिवसेना (शिंदे गट)