Boisar tarapur industrial area development : बोईसर पूर्वेत नागरी समस्यांचा विळखा कायम

लेखी आश्वासनाची मुदत उलटूनही प्रश्न जैसे थे
Boisar tarapur industrial area development
Boisar tarapur industrial area developmentpudhari photo
Published on
Updated on

बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीच्या विस्तारामुळे बोईसर परिसराचा झपाट्याने विकास होत असताना वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नागरी सुविधा मात्र अपुऱ्या पडत आहेत. विशेषतः बोईसर पूर्व भागातील रस्ते, गटारे, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधां-बाबत नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. या समस्या सोडविण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर यापूर्वी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र आश्वासनाची मुदत उलटूनही प्रश्न कायम असल्याचा आरोप करीत नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बोईसर परिसराची लोकसंख्या दोन लाखांपेक्षा अधिक झाली असून औद्योगिक वसाहतीमुळे दरवर्षी नागरिकरणात वाढ होत आहे. मात्र या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक नागरी सुविधा पुरविण्यात ग्रामपं-चायत प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बोईसर पश्चिमेच्या तुलनेत पूर्व भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Boisar tarapur industrial area development
Bjp protest against vvmc corruption : वसई - विरार महानगरपालिकेतील घोटाळ्याप्रकरणी भाजपची निदर्शने

पूर्व भागातील नागरी समस्यांविरोधात गेल्या वर्षी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर प्रशा-सनाकडून समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही अपेक्षित सुधारणा झाल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. चंदन सिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत १० जुलै रोजी बोईसर ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, खासदार डॉ हेमंत सावरा यांच्या मध्यस्थीने ग्राम-पंचायत प्रशासनाने दोन ते तीन महिन्यांत समस्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीतही समस्या सोडविण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Boisar tarapur industrial area development
Mahad News : महाड झाले कमानींचे शहर; पण प्रबोधनाचा संदेश हरवला

बोईसर पूर्व भागातील कचरा नियमित उचलण्याचे काम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी पथदिवे बसवून ते सुरू करण्यात आले आहेत. गटारे आणि रस्त्यांची कामे मंजूर झाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचे नियोजन आहे.

कमलेश संखे, ग्राम विकास अधिकारी बोईसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news