Mahad News : महाड झाले कमानींचे शहर; पण प्रबोधनाचा संदेश हरवला

हजारो स्वागत कमानींवर सामाजिक संदेशाचा अभाव; पालिकेकडून कारवाईची अपेक्षा
mahad ganeshotsav arch banners
mahad ganeshotsav arch bannerspudhari photo
Published on
Updated on

महाड : श्रीकृष्ण बाळ

गणेशोत्सव म्हटला की भक्ती, उत्साह, सजावट आणि सामाजिक प्रबोधनाचा जागर असतो. महाड शहरात दरवर्षा प्रमाणे यंदाही गणे-शोत्सवात याच उत्साहाला कमानींची झालर लाभली असून, शहरातील गल्लीबोळांपासून प्रमुख रस्त्यांपर्यंत ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि बॅनर उभारण्यात आल्याने 'महाड हे कमानींचे शहर' बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र या हजारो कमानींवर गणेश भक्तांचे स्वागत, मंडळाचे नाव आणि देणगीदारांची नावे यापलीकडे समाजाला दिशा देणारा एकही संदेश दिसत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

महाड शहरातील जवळपास प्रत्येक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण-गीदारांकडून आर्थिक मदत मिळते. या देणगी-दारांच्या नावांचा उल्लेख करत मंडळांकडून मोठमोठ्या स्वागत कमानी उभारल्या जातात. या कमानींवर गणरायाचे छायाचित्र, मंडळाचे नाव, पदाधिकारी आणि देणगीदारांची नावे अशा स्वरूपाचा मजकूर असतो. त्यामुळे गणेशभक्तांचे स्वागत तर होते; मात्र 'समाजाला काय सांगायचे?' हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

mahad ganeshotsav arch banners
khopoli railway station crowd issue : खोपोली रेल्वे स्थानकात प्रवाशांची घुसमट

विशेष म्हणजे, महाड शहरातील गणेशोत्सव मंडळे सामाजिक प्रबोधनाच्या बाबतीत दरवर्षी उल्लेखनीय काम करीत आहेत. जिवंत देखावे, चलचित्रे, भित्तिचित्रे आणि विविध सामाजिक विष-यांवरील सादरीकरणातून पर्यावरण, व्यसनमुक्ती, सामाजिक एकोपा, महिला सुरक्षा, स्वच्छता यांसह विविध विषयांवर जनजागृती केली जाते. मग याच मंडळांच्या शेकडो स्वागत कमानींवर समाजप्रबो-धनाचा एखादा संदेश का नसावा? हा सवाल आता उपस्थित होत आहे.

'महाड स्वच्छ आणि सुंदर ठेवा', 'प्लास्टिकचा वापर टाळा', 'सावित्री नदीचे प्रदूषण रोखा', 'पर्यावरणाचे रक्षण करा', 'गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा', 'वाहतूक नियमांचे पालन करा', 'रक्तदान करा' अशा छोट्या-छोट्या संदेशांमधून हजारो नागरिकांपर्यंत सामाजिक विचार पोहोचविता आला असता. मात्र स्वागत कमानींच्या गर्दीत अशा संदेशांची कमतरता जाणवत आहे. या कमानी उभारण्यासाठी महाड नगरपरिषदेलाही मंडळांकडून उत्पन्न मिळते. त्यामुळे पालिकेने केवळ परवानगी आणि शुल्कापुरते मर्यादित न राहता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्वागत कमानींवर किमान एक जनजागृतीपर संदेश असावा, अशी अट घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

याबाबत महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे विचारणा केली असता, कमानींवर जन-जागृतीपर संदेश देण्याची सूचना अत्यंत स्तुत्य असून भविष्यात अशा प्रकारच्या सूचना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांतच नवरात्रो-त्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवातही शहरात मोठ्या प्रमाणावर स्वागत कमानी उभारल्या जातात. त्यामुळे आगामी उत्सवांमध्ये केवळ 'स्वागत' करणाऱ्या नव्हे, तर समाजाला जागविणाऱ्या कमानी उभ्या राहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कमानी उभारा; पण त्यावर विचारही उभारा !

गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या स्वागत कमानींवर किमान एक जनजागृतीपर संदेश देण्याची परंपरा सुरू केली, तर भक्तीच्या उत्सवाला प्रबोधनाची जोड मिळून महाडच्या कमानीही समाजजागृतीचे माध्यम बनू शकतात.

mahad ganeshotsav arch banners
Raigad News : उरण तालुक्यात मलेरिया, डेंग्यूचा प्रकोप
  • महाड नगर परिषदेला मागील काही वर्षात स्वच्छता व अन्य विषयांबाबत कोकणस्थरीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत.यामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सहभाग आहे किंवा कसे किंबहुना याचा खुलासा झालेला नाही.

  • अशा कमानीतून नगरपालिका प्रशासनाला किती लाखो रुपयांच उत्पन्न प्राप्त होते याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत असून याची माहिती नगरपालिका प्रशासनाने जाहीर करावी अशी अपेक्षा महाडकर नागरिक व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news