Bjp protest against vvmc corruption : वसई - विरार महानगरपालिकेतील घोटाळ्याप्रकरणी भाजपची निदर्शने

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांची मागणी
bjp protest against vvcmc corruption
bjp protest against vvcmc corruptionpudhari photo
Published on: 
Updated on: 

वसई : वसई-विरार महानगरपालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात, तसेच नागरिकांच्या वाढत्या समस्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. बुधवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. आंदोलना-नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पालिका प्रशासनावर आणि सत्ताधा प्ऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

मनोज पाटील यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापनातील ३८ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केवळ ठेकेदारच दोषी नसून ज्या अधिकाऱ्यांनी ही बिले तपासून मंजूर केली, ज्या कन्सल्टंटने प्रक्रियेला मान्यता दिली आणि ज्यांनी पेमेंट दिले, ते सर्व अधिकारी तितकेच जबाबदार आहेत. ठेकेदाराने सादर केलेल्या बिलांची योग्य ती पडताळणी करणे आणि त्रुटी दूर झाल्याशिवायपेमेंट न रोखणे ही अधिकाऱ्यांची मुख्य जबाबदारी होती, मात्र अधिकाऱ्यांनी डोळेझाक करत गैख्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला.

bjp protest against vvcmc corruption
Palghar public works department scam : 73 लाखांच्या अपहार प्रकरणात तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी कोण?

एफआयआर दाखल होऊनही संबंधित अधिका-ऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. हे अधिकारी महापा लिकेत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिल्यास चालू असलेली चौकशी प्रभावित होण्याची आणि कागदप-त्रांमध्ये फेरफार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची तात्काळ विभागीय चौकशी करून त्यांना पदावरून दून करण्यात यावे, तसेच कन्सल्टंटवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

महापालिका आयुक्तांकडे यापूर्वीच सर्व विषय मांडूनही त्यांनी कोणतीह ठोस कारवाई केली नाही, म्हणूनच भाजपला रस्त्यावर उतरून निदर्शन करावी लागली. आगामी काळात सर्व संबंधित वरिष्ठ यंत्रणांकडे पाठपुरावा करून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणल्याशिवाय पालिका भाजप शांत बसणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

bjp protest against vvcmc corruption
khopoli railway station crowd issue : खोपोली रेल्वे स्थानकात प्रवाशांची घुसमट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news