पालघर : अब्दुल सत्तारांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन (व्हिडिओ) | पुढारी

पालघर : अब्दुल सत्तारांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन (व्हिडिओ)

पालघर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हुतात्मा चौकात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी एकच गद्दार अब्दुल सत्तार, पन्नास खोके एकदम ओके, अशा घोषणा देत सत्तार यांचे मंत्रिमंडळातून निलंबन करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

यावेळी पक्षाचे सरचिटणीस अनिल गावड, महिला युवा नेत्या नगरसेविका हिंदवी पाटील, नगरसेविका शिल्पा बाजपेयी, माजी नगरसेवक हाजी फरीद लुलानिया, अस्लम मणियार, सचिव संदेश पाटील, वीरेंद्र पाटील, तेजस पवार, पंचायत समिती सदस्य आनंद पंडित, सचिन पाटील, विशाल मोहोड आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button