सातारा : उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून चिमुरडा ठार | पुढारी

सातारा : उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून चिमुरडा ठार

लोणंद :  कापशी, ता. फलटण येथे उसाच्या ट्रॉली खाली सापडून अवघ्या 12 वर्षाच्या मुलाचा चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस महेंद्र खताळ (वय 12, रा. कापशी, ता. फलटण) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

कापशी गावच्या हद्दीत हिंगणगाव ते कापशी जाणार्‍या रोडवर ट्रॅक्टर चालक संदिप कचरु पायघन (रा. सुप्पा, ता पाटोदा जि. बीड) ट्रॅक्टरला दोन ट्रॉलीचे जुगाड लावून त्यामध्ये ऊस भरुन कापशी गावाकडे जात होता. ट्रॅक्टर भरधाव वेगात झोला मारत होता. याचवेळी रस्त्याच्या बाजूने घराकडे जात असलेल्या श्रेयश महेंद्र खताळ याला ट्रॉलीचा धक्का लागला. यामध्ये श्रेयस खाली पडून त्याच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विकास खताळ यांच्या फिर्यादीवरून चालक संदीप पायघन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button