

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात सलग सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात
शहरात 50 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. गेल्या 12 दिवसांत तब्बल 166 मिमी पाऊस झाल्याने शहराची अक्षरश: दाणादाण उडाली. मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे.
अनेक ठिकाणी झाडपडी अन् जुन्या घरांच्या भिंती पडल्या. त्यात एकाचे प्राण गेले, तर एका भाजी विक्रेत्याच्या अंगावर विजेची तार पडल्याने तो जागीच गतप्राण झाला. नदीपात्राच्या भागात चारचाकीही पाण्याखाली गेल्या होत्या.