

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
येथील लासलगाव सायकलिंग असोसिएशनच्या वतीने लासलगाव ते पंढरपूर सायकल राइडसाठी पंढरीच्या वारीस गुरुवारी (दि.23) सायंकाळी 5 वाजता दत्त मंदिर येथून झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. येथील सायकलिंग असोसिएशनचे 20 सदस्य 24 ते 26 जून या अडीच दिवसांत 355 किलोमीटर अंतर पार करणार आहेत. या सायकल रॅलीतून 'राइड फॉर हेल्थ व प्राइड फॉर नेशन्स' असा संदेश दिला जाणार आहे.
सायकल राइडमध्ये लासलगाव ते येवला त्यानंतर येवला ते अहमदनगर, अहमदनगर ते टेंभुर्णी, टेंभुर्णी ते पंढरपूर असा 355 किलोमीटरचा प्रवास या माध्यमातून केला जाणार आहे. यावेळी दत्त मंदिर लासलगाव सायकलिंग असोसिएशनच्या हस्ते घड्याळ सप्रेम भेट देण्यात आले. यावेळी डॉ. अनिल बोराडे व सुनील उगलमुगले यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल ब्रह्मेच्या, ज्येष्ठ सदस्य संजय पाटील, डॉ. किरण निकम, डॉ. अनिल ठाकरे, संजय कदम, सुनील ठोंबरे, तुषार लोणारी, विजय वैद्य, डॉ. उत्तम रायते, रियाज शेख, सागर खांबेकर, व्यंकटेश वाबळे, अमोल गंगेले, अरुण थोरे, विजय कुंदे आदी मदतीचा हात देणार आहे.
सायकल राइडच्या माध्यमातून 'प्राइड फॉर हेल्थ आणि प्राइड फॉर युनिटी' हा संदेश दिला जाणार आहे. या माध्यमातून समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा सायकल असोसिएशनचा उदात्त हेतू आहे.
– अनिल ब्रह्मेच्या, अध्यक्ष,
सायकलिंग असोसिएशन, लासलगावकोरोनाच्या विळख्यानंतर दोन वर्षांनंतर यंदा सायकल राइडच्या माध्यमातून राज्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आम्ही विठुरायाला साकडे घालणार आहोत.
– संजय पाटील,
ज्येष्ठ सदस्य