नाशिक : हातात तलवार घेऊन दहशत माजविणार्‍यास अटक

नाशिक : हातात तलवार घेऊन दहशत माजविणार्‍यास अटक

नाशिकरोड : नाशिक- पुणे महामार्गावर शिंदेगाव येथे हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणार्‍या तरुणासह दोन अल्पवयीन मुलांना नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून तलवारीसह दोन मोबाइल फोन जप्त केले आहेत.

नाशिकरोड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी सोमनाथ जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव परिसरात तीन युवक हाती तलवार घेऊन दहशत निर्माण करीत होते. तिघा संशयितांना ताब्यात घेतले असता, त्यांची चौकशी व अंगझडती घेण्यात आली. अमोल बाळू इंगळे (रा. पाथर्डी फाटा) याच्याकडे तलवार आढळली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news