उत्तर महाराष्ट्र
नाशिक : वृध्द महिला डॉक्टरला 11 लाखांचा घातला गंडा
नाशिक : परदेशातून गिफ्ट पार्सल पाठविण्याच्या बहाण्याचे वृध्द महिला डॉक्टरला ११ लाख २३ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अरूणा अशोक वानखेडे (७२, रा. अर्थव बंगला, रामेश्वरनगर, गंगापूररोड) यांना डॉ. ॲलेक्स व त्यांच्या मदतनीस महिलेने फोनद्वारे संपर्क करून लंडनमधून गिफ्ट पार्सल पाठवित असल्याचे सांगितले. मनी लॉडींग क्लिअर सर्टिफिकेशन, पोलीस क्लिअरंन्स व मनी एक्सचेंज करण्यासाठी ६ जून २०२२ पासून वेळोवेळी ११ लाख २३ हजार भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.