नाशिक : बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेप्रकरणी आयोजकांवर गुन्हा

नाशिक : बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेप्रकरणी आयोजकांवर गुन्हा

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पाच पदाधिकार्‍यांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने मोर्चाची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती. मात्र, त्यात प्रतीकात्मक तिरडी व अंत्यसंस्कार केल्याने नियमांचा भंग केल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्य विधान सभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, पश्चिम विधानसभा प्रमुख सुभाष गायधनी, उपमहानगरप्रमुख देवा जाधव, मध्य शहर संघटक विरेंद्र टिळे, उपजिल्हाप्रमुख रूपेश पालकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आयोजकांची नावे आहेत. नियमांचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याने राजकीय तणाव वाढला आहे. राजकीय आंदोलने तीव— होत असल्याने पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना कलम 149 अंतर्गत नोटिसा बजाविण्यात आल्या असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन न करण्याचे आदेश दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत 20 जणांना नोटीस बजावल्याचे समजते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news