नाशिक : पाय घसरून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू

नाशिक : पाय घसरून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू
Published on
Updated on

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पाथरशेंबे येथील युवक प्रातर्विधीस जात असताना चिखलात पाय घसरून तो विहिरीत पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसपाटील वाल्मीक पवार (40) यांनी खबर दिल्याने चांदवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाथरशेंबे येथील 25 वर्षीय सचिन नामदेव साठे हा तरुण सकाळी 6.45च्या सुमारास प्रातर्विधीस जात होता. यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलात त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो जवळच असलेल्या विहिरीत पडला. विहीर तुडुंब भरलेली असल्याने त्याचा शोध घेण्यात वेळ गेला. त्याला नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस कर्मचारी बी. एन. वाळेकर अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news