वय लपविण्यासाठी हीरोही घेतात ब्युटी ट्रिटमेंट

वय लपविण्यासाठी हीरोही घेतात ब्युटी ट्रिटमेंट
Published on
Updated on

चित्रपटसृष्टीतील नायिका वय लपविण्यासाठी आणि सौंदर्यासाठी बरेच पैसे खर्च करत असतात. अनेकदा शस्त्रक्रिया करून घ्यावी लागत असते. यात पुरुष कलाकारही मागे नाहीत. आकर्षक लूकसाठी नायकही हजारो खटपटी करतात. ब्युटी ट्रिटमेंट घेण्यात हे कलाकार नायिकांनाही मागे टाकतात. पडद्यावर आपले वय कमी दिसावे, यासाठी त्वचा आणि केसांवर उपचार करून घेणार्‍या इंडस्ट्रीतील पुरुष कलाकारांविषयी…

शाहरूख खान

शाहरूख खान आजकाल त्याच्या 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन चित्रपटांमुळे चर्चेत असतो. शाहरूख स्वतःच्या फिजिकल फिटनेसची विशेष काळजी घेत असतोच शिवाय स्वतःच्या लूकचीही तो खूप काळजी घेतो. एका माहितीनुुसार शाहरूखने बोटॉक्स ट्रिटमेंट घेतली आहे. तरुण दिसण्यासाठी इतरही काही इंजेक्शन्स त्याने घेतल्याचे समजते. बोटॉक्समुळे त्वचा तजेलदार, चमकदार होते. त्यामुळे व्यक्तीचे वय कमी दिसते. बोटॉक्स ट्रिटमेंटमध्ये चेहर्‍यावरील सुरकुत्या असलेल्या भागात इंजेक्शनचे डोस दिले जातात. त्यामुळे चेहर्‍यावरील स्नायूंना आराम मिळतो आणि त्वचा चमकदार होते. या ट्रिटमेंटमुळे सुरकुत्या जातात.

अक्षय कुमार

लेट नाईट पार्ट्यांना न जाणारा, पहाटे सूर्य उगवण्याआधी उठणारा अभिनेता म्हणून अक्षयकुमारची ओळख आहे. खिलाडी अक्षय कमालीचा फिट आहे; पण अक्षयचे केस गळू लागले होते. त्यामुळे काही काळ त्याने विग घालून काम केले. त्यानंतर अक्षयने हेअर ट्रान्स्प्लांट करवून घेतले.

आमिर खान

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे यात माहीर आहे. आमिरनेही चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली होती.

रणबीर कपूर

बी टाऊनमधील हँडसम स्टार म्हणून रणबीरची ओळख आहे. तथापि, आलिया भट्टशी लग्नाआधी रणबीरने त्याची हेअरलाईन ठीक करून घेतली होती. तसेच त्यानेही हेअर ट्रान्स्प्लांट सर्जरी केली होती.

सलमान खान

सलमाननेही त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उठावदार करण्यासाठी अनेक ब्युटी ट्रिटमेंट घेतल्या आहेत. त्याने हेअर ट्रान्स्प्लांट केले आहे. बोटॉक्स ट्रिटमेंट आणि चीक फिलर्सदेखील करून घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news