नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी

नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वर्षा पर्यटनासाठी विविध शहरांतून सहकुटुंब ग्रामीण भागात दाखल होणार्‍या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीच्या 'निवास-न्याहारी' योजना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. खिशाला परवडणारे दर आणि चोख व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. शहरी भागांतून येणार्‍या पर्यटकांसाठी ग्रामीण भागाचा अनुभव घेता येत असल्याने 'निवास-न्याहारी'ला वाढती पसंती मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर आदी परिसर पर्यायी लोणावळा म्हणून ओळखले जातो. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. एमटीडीसीच्या निवास व न्याहारी योजनेमुळे घोटी, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या भागांत मुंबईकडून येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्टार कॅटेगरीत निवास-न्याहारी योजनाधारकांच्या पूरक सुविधांना दर्जा देण्याचे कामही केले जात असल्याने पर्यटकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे 'निवास-न्याहारी' तसेच 'महाभ्रमण' या दोन योजनांच्या माध्यमातून स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळले आहे. 'निवास-न्याहारी'च्या माध्यमातून स्थानिकांच्या रिकाम्या जागांचा फायदा करून घेण्यात येत आहे. विशेषत: घरातील महिलांसाठी ही रोजगाराची चांगली संधी आहे. पर्यटकांना स्थानिकांसमवेत राहण्याची, त्यांची संस्कृतीची ओळख होत आहे. स्वच्छ व घरगुती व्यवस्थेमुळे पर्यटकांचाही ओढा वाढत आहे.

वन्यजीव विभागाकडूनही चाचपणी
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर या ठिकाणी पावसाळ्यातच पर्यटकांची गर्दी होते. या ठिकाणी पर्यटकांची उत्तम प्रकारे राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी 'होम स्टे' अथवा 'निवास-न्याहारी' केंद्र सुरू करण्याबाबत वन्यजीव विभागाकडून चाचपणी केली जात आहे. प्रत्येक बीटमध्ये एक केंद्र देण्याचा विचार वन्यजीव विभागाकडून सुरू आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news