विविध सामाजिक संघटनांकडून वृक्षारोपण

विविध सामाजिक संघटनांकडून वृक्षारोपण
Published on
Updated on

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेसाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था संधटनांच्या वतीने रविवारी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. रेल्वे विभाग सोलापूर, संत निरंकारी मंडळ, माऊली डेव्हलपर, वाईल्डलाईफ काँझर्वेशन असो., सामाजिक वनीकरण, माझी वसुंधरा सोलापूर मनपा, गिरीकर्णिका, फाऊंडेशन, इनरव्हील क्लब, ड्रीम फाऊंडेशन, जयोस्तुते फाऊंडेशन, झाडांची भिशी, पर्यावरण संरक्षण गतिविधी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 8 ते 2 या वेळेत प्रथम पॅगोडा येथे छोटेखानी समारंभ होऊन मनोगते झाली.

माऊली डेव्हलपरकडून भविष्यात सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणासाठी लागेल तेवढी रोपे देण्याची ग्वाही माऊली झांबरे यांनी दिली. सोलापूरचे तापमान कमी व्हावे, यासाठी माऊली डेव्हलपर सतत प्रयत्नशील राहील, असे ते म्हणाले. शिवाजी कदम यांनी रेल्वेच्या सर्व जागांवर डीआरएम गुप्ता व एडीआरएम यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेच्या आणखी ओपन स्पेसवर व रेल्वे स्टेशनवर येत्या तीन चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल, असे सांगितले. 24 एकर जागेवर, स्मृती उद्यानासमोर वड, पिंपळ, कडुलिंब अशी 75 व अन्य 25 रोपे लावण्यात आली. रेल्वेच्या आवारात वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, सावर, काशीद, महोगनी, सीताफळ, चेरी, अशी विविध प्रकारच्या 8 ते 10 फूट उंच एकूण 300 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

संत निरंकारी मंडळाचे तीन राज्यांचे प्रमुख इंद्रपाल व त्यांच्या सुविद्य पत्नी, रेल्वे विभागाचे शिवाजी कदम व त्यांच्या मातोश्री, संजय उस्तुर्गे, संजय पोळ, माऊली झांबरे, संत निरंकारी मंडळाचे सोलापुरातील 150 सदस्य, बिराजदार, काशिनाथ भतगुणकी, श्रीपाद वेणेगुरूकर, कालिदास कोरे, इनरव्हील क्लबच्या श्‍वेता व त्यांचे सर्व टीम मेंबर, प्रवीण तळे, विजय जाधव, राजेश वडीशेरला, मनमोहन बरेंकल, सूरज लांडगे, जयोस्तुते फाऊंडेशनचे सर्व सदस्य, शैलेश स्वामी, मठपती, बोरामणी, प्रचंडे, परमेश्‍वर पाटील, अजित चौहान, संतोष धाकपाडे, निरंजन मोरे, सिद्धांत चौहान उपस्थित होते. संजय उस्तुर्गे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास 300 जणांची विशेष उपस्थिती होती. डीआरएम शैलेश गुप्ता, एडीआरएम शैलेंद्रसिंह परिहार, सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news