

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना सर्व मूलभूत सुविधा देणार असल्याचे प्रतिपादन मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी पॉवर हाऊस येथे आयोजित स्वच्छता अभियानाच्या प्रारंभाप्रसंगी केले. आयमा, महापालिका, एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत या अभियानाला सुरुवात झाली.
'क्लीन अंबड-ग्रीन अंबड' ही संकल्पना आम्ही सुरू केली आहे. संपूर्ण औद्योगिक वसाहतीत हे अभियान राबविले जाणार असल्याचे पांचाळ यांनी सांगितले. खाडे यांनी औद्योगिक वसाहतीत चौकांचे सुशोभीकरण, कचरा व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण उपक्रम राबवले जाणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, बीओटीचे अध्यक्ष धनंजय बेळे व खोडे यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात झाली. यावेळी सिडको विभागीय अधिकारी मयूर पाटील, कार्यकारी अभियंता जयंत बोरसे, स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, हेमंत भालेराव, आर. डी. मते, एच. के. पंठे, बी. आर. बागूल, एमआयडीसीचे उपअभियंता जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता संजय सानप उपस्थित होते. आयमा अॅक्रिएशन सेंटरमधील के. आर. बूब सभागृहामध्ये चर्चेप्रसंगी व्यासपीठावर सरचिटणीस ललित बूब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, गोविंद झा, महावितरणचे अमोल बोडके उपस्थित होते.
अंबड, सातपूरला कंपन्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने उद्योगांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अंबडच्या उद्योजकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन रमेश पवार यांनी दिले होते. त्याची सिडको व एमआयडीसीच्या अधिकारी यांनी दखल घेऊन स्वच्छता अभियान व नालेसफाई मोहीम घेण्याचे ठरविले.
यावेळी आयामाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, प्रमोद वाघ, विनायक मोरे, दिलीप वाघ, अविनाश मराठे, हर्षद बेळे, जगदीश पाटील, जयंत जोगळेकर, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, अविनाश बोडके, विराज गडकरी, रवींद्र झोपे, के. एन. पाटील, मूलभूत सेवा समितीचे अध्यक्ष हेमंत खोंड, सहअध्यक्ष कुंदन डरंगे, संदीप जगताप, धीरज वडनेरे, चेतन पाटील, अशोक ब—ाह्मणकर, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, अजय यादव, सुरेश चावला, मृदुला जाधव आदी उद्योजक उपस्थित होते.