सहज… सोपे… झेपतील असे नवीन वर्षाचे तरुणाईचे संकल्प

सहज… सोपे… झेपतील असे नवीन वर्षाचे तरुणाईचे संकल्प
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. साहजिक प्रत्येकाकडून नवीन संकल्प केले जातात. एखादा संकल्प पूर्ण करण्यासाठी मनावर ताबा असणे गरजेचे असते तरच संकल्प पूर्ण करता येऊ शकतो. त्यासाठी फार अवघड संकल्प करण्याची गरज नाही. सहज.. सोपे.. झेपतील असे संकल्प करता येतात. यानिमित्ताने नवीन वर्षाचे तरुणाईचे संकल्प काहीसे असेच असल्याचे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाले.

नवीन वर्ष कसे असेल? काय असेल? यासाठी मी खूप उत्साही आहे. कोविडमुळे कॉलेज बंद होते. आता नव्याने सुरू झाले आहे, त्यामुळे भूतकाळात झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेईल. खूप मेहनत घेईल. – तमन्ना शिरसाठ

या वर्षी मी भरपूर ठिकाणी प्रवास करायचे ठरवले आहे. नवीन अनुभव घ्यायचा आहे. नवीन लोकांना भेटायचे आहे. खूप शिकायचे आहे. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकण्याचा मी संकल्प केला आहे. – स्वराज पवार

तंत्रज्ञानावर आपण खूप अवलंबून असतो. यामुळे आपल्यातील सहन करण्याची क्षमता म्हणजे पेशन्स कमी झाला आहे. यासाठी स्वत:वर संयम कसा ठेवता येईल याचा विचार मी केला आहे. – हिरल पंड्या, विद्यार्थिनी

पाण्यात पडल्याशिवाय जसे पोहता येत नाही, तसे रिस्क घेतल्याशिवाय ध्येय साध्य करता येत नाही. त्यामुळे ध्येय पूर्ण झाले नाही तरी चालेल पण त्यातून शिकायला मिळेल. अशी रिस्क मी नक्की घेईल. – आर्यन शिरसाठ

जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी जोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मैत्रीत ना वयाची अट असते ना कोणती बंधने त्यामुळे मी फ्रेंडसर्कल वाढवणार आहे. त्यांना काही समस्या असेल तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. – पार्थ गुर्जर

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news