

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगाव शिवारातील एका टायर रिमोल्डींग गॅरेजमध्ये परराज्यातील युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मोहमंद रशिद मोहमंद तम शेख (२५, रा. जि. मुज्जफरपूर, राज्य बिहार) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
शेख याने सोमवारी (दि.११) मध्यरात्री गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.