लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न सुटणार ; सरपंचांनी दिली महत्वाची माहिती

लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न सुटणार ; सरपंचांनी दिली महत्वाची माहिती
Published on
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) वार्ताहर 

लासलगाव विंचूर १६ गाव पाणीपुरवठा समितीच्या दुरुस्तीच्या सुधारित अंदाजपत्रकास २० कोटी १० लक्ष २५ हजार इतका निधी मंजूर झाल्याची माहिती लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली. सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे दुरुस्तीच्या कामासाठी यापूर्वी ४ जानेवारी २०२२ रोजी शासनाने १७ कोटी ५४ लक्ष निधी मंजूर केला होता. परंतु त्या अंदाजपत्रकाच्या किंमतीत ना. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून शासनाने २० कोटी १० लक्ष २५ हजार इतका निधी मंजूर केला आहे. वाढीव निधी मंजूर केल्यामुळे दुरुस्तीच्या कामास लवकरात लवकर सुरुवात होऊन लासलगावसह १६ गावांचा पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे अशी माहिती लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली.

लासलगाव, विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात सन २०१० पासून कार्यान्वित करण्यात येऊन ही योजना सन २०१२ साली संयुक्त पाणी पुरवठा समितीकडे देखभालदुरुस्ती व योजना यशस्वीरित्या चालविण्यासाठी हस्तांतरित करण्यात आलेली होती. ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या सोळा गावांसाठी अतिशय उपयुक्त योजना ठरली आहे. या योजनेची पाईपलाईन जुनी झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजचा सामना करावा लागत असल्याने योजना चालविणे अतिशय कठीण बनले होते. लासलगाव-विंचूर १६ गाव पाणीपुरवठा समितीचे दुरुस्तीचे सुधारित अंदाजपत्रकास २० कोटी १० लक्ष २५ हजार इतका निधी मंजूर झाल्याने लासलगावसह १६ गावांचा पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे

या योजनेमध्ये लासलगाव, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, विष्णूनगर, डोंगरगाव, नांदगाव, कोटमगाव, टाकळी विंचूर, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव विर, ब्राम्हणगाव विंचूर, पिंपळगाव नजिक, निमगाव वाकडा, हनुमाननगर या सोळा गावांचा समावेश असून योजनेच्या नुतनीकरणामुळे येथील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news