जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार
Published on
Updated on

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

जळगावात आज (दि. ६) दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे जागीच ठार झाले आहेत. तालुक्यातील कुसुंबा येथील ४८ वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाली आहे. तर जळगाव शहरातील खोटे नगराजवळ भरधाव आयशरने धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता कैलास पाटील (४८) यांचे पती कैलास पाटील यांना औषोधपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची पत्नी संगीता पाटील या शुक्रवारी (दि. ६) सकाळी सासू इंदुबाई यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येण्यासाठी निघाल्या होत्या. कुसुंबा गावातून येत असताना भरधाव येणाऱ्या रुग्णवाहिका क्रमांक (एमएच १९, सीवाय, ७०९१) ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत संगीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुस-या घटनेत
ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार…
रावेर तालुक्यातील प्रशांत भागवत तायडे (३०) आणि जयेश द्वारकानाथ पाटील (२३) हे दोघे मित्र शुक्रवारी (दि. ६) सकाळी रावेर तालुक्यातील गहुखेडा येथून दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीपी २३५५) बांभोरीकडे जाण्यासाठी निघाले. दुपारी १ च्या सुमारास खोटे नगर जवळील वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गवर भरधाव आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय ८१६७)ने दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. तेवढ्यात समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २४३८) वाहनाखाली प्रशांत तायडे आल्याने त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने जागीच ठार झाला. तर मागे बसलेला त्याचा मित्र जयेश हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news