जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

घरफोडी
घरफोडी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

सणासुदीच्या कालावधीत शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. सुट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी गेले असल्याने ही संधी साधून चोरटे अशा बंद घरांना निशाणा बनवित आहेत. घरफोडी करुन चोरांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शहरातील सोनीनगरात उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत प्रदीप सुर्यवंशी (३१, रा. सावखेडा रोड, सोनीनगर) हे पत्नी व दोन मुलांसोबत सासुरवाडी नादेंड येथे गेले होते. त्यानंतर घराला कुलूप लावून नांदेड येथील काम आटोपून पुन्हा राहत्या घरी आले असता त्यांना कंम्पाउंडगेटचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात बघितले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. घरात जावून पाहिले असता, चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदींचे दागिने, लॅपटॉप आणि मोबाईल असा एकूण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसस्टेशनला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news