दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : जांबुटके येथील राज्यातील पहिल्या आदिवासी औद्योगिक समूहासाठी ३१.५१ हेक्टर जमीन शासनाने नुकतीच औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे येथील नियोजित आदिवासी औद्योगिक क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी भागातील उद्योजकांसाठी स्वतंत्र आदिवासी औद्योगिक समूह (Tribal Industrial Cluster) व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळत दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे राज्यातील पहिले आदिवासी औद्योगिक समुहास मान्यता मिळाली होती. यासाठी आवश्यक जागा ही जांबुटके शिवारातील गट न. १७८ मधील २४.३७ हे. आणि १७९ मधील ७.१४ हे. असे एकूण ३१.५१ हेक्टर जमीन ही शासनाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले असून त्याबाबत १ डिसेंबरला अधिसूचना जारी केली आहे.
सदर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने ही जागा जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडून औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग होवून पुढील पायाभूत सुविधा आदी कामांना गती मिळत लवकरच राज्यातील पाहिले आदिवासी औद्योगिक समूह अस्तित्वात येणार आहे.
हेही वाचलंत का?