नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
Published on
Updated on

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. घरात बालमृत्यु झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज (दि.११) दिले आहेत.

ते पुढे म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी दुर्गम भागात नियमित जात नसल्याने कुपोषित बालक, गरोदर मातांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. ते वेळेवर दवाखान्यात पोहचू शकत नाही. जर आरोग्य यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी वेळेवर पोहचले तर कुपोषित बालके आणि गरोदर महिलांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच उपचारासाठी देखील तात्काळ रुग्णालयात दाखल करता येईल असे मत यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाड्या-पाड्यापर्यंत आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काही महिन्यात बारमाही रस्त्यांची बांधणी देखील केली जात आहे. तर दुर्गम-अतिदुर्गम भागातील विद्युतीकरणाच प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. गरज भासल्यास गुजरात, मध्यप्रदेश सरकारच्या सामंजस्याने अतिदुर्गम भागात विद्युत पुरवठा करुन हा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल,असेही यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयास डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात आरोग्य सुविधा पुरविण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी आरोग्याशी संबंधीत सर्व समस्या त्यांनी यंत्रणेकडून जाणून घेत राज्य तसेच जिल्हा स्तरावर याचे लवकरच निराकरण करुन दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे देखील बळकटीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, रस्त्यांची निर्मीती होईपर्यंत बांबुची झोळी करुन रुग्णांना दवाखान्या पर्यंत नेणाऱ्यांना काही अनुदान किंवा मानधन देता येईल का आणि तालुका स्तरावर शववाहिकाबाबत शासन स्तरावरुन तात्काळ निर्णय घेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र आरोग्य यंत्रणेने सजग राहून जिल्ह्यातील आरोग्य समस्या मार्गी लावण्याची गरज मंत्री डॉ गावितांनी यावेळी बोलताना आवर्जून अधोरेखित केली.

यावेळी झालेल्या चर्चेत, जिल्हा परिषदेच्य अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे, ज्येष्ठ समाजसेवी डॉ कांतीलाल टाटीया, लतिका राजपुत, चेतन साळवे यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news