SSC Result 2022 : जळगाव जिल्ह्यात मुलीच ठरल्या अव्वल!, ९५.७२ टक्के निकाल

SSC Result 2022 : जळगाव जिल्ह्यात मुलीच ठरल्या अव्वल!, ९५.७२ टक्के निकाल
Published on
Updated on

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ९५.७२ टक्के लागला आहे. विभागात जळगाव जिल्ह्याने बाजी मारली असुन नाशिकनंतर जळगाव जिल्हा निकालात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ५७ हजार ८८ विद्यार्थ्यापैकी ५४ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तसेच २४ हजार ७८९ परिक्षार्थी मुलींपैकी २३ हजार ९७२ मुली पास झाल्या आहे. त्यामुळे यंदा देखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदा सुधारीत मुल्यमापन कार्यपध्दती नुसार परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिक विभागाचा ९५.९० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याचा ९५.७२ टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी ५७ हजार ८८ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९५.७२ टक्के आहे.

विशेष प्राविण्य मिळविणारे २७ हजार २४१ विद्यार्थी
नाशिक विभागात दहावीच्या निकालात ९१ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य या श्रेणीत यश मिळविले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील २७ हजार २४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी १९ हजार १८८ असून व्दितीय श्रेणीत ७ हजार २५३, तर पास श्रेणी मध्ये ९६४ विद्यार्थी पास झाले आहे.

जिल्ह्यात १५ गैरमार्गाची प्रकरणे
यंदा दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यात कॉपी सुसाट चालली; मात्र जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पथकाने एकही कारवाई झाली नाही. मात्र नाशिक विभागाकडे जिल्ह्यातील १५ कॉपी प्रकरणाची नोंद असुन विभागाच्या ६९ गैरमार्गाची प्रकरणे नोंद झाली आहे. त्यापैकी ५ प्रकरणे निदार्ेष असुन जिल्ह्यातील १५ प्रकरणात शास्ती देण्यात आली आहे. मात्र माध्यमिक विभागाने परिक्षाकाळात एकही प्रकरणावर कारवाई केली नव्हती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news