राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात

सातपूर : खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करताना कल्पेश कांडेकर, नीलेश सोनवणे, सागर पवार आदी. (छाया : सागर आनप)
सातपूर : खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करताना कल्पेश कांडेकर, नीलेश सोनवणे, सागर पवार आदी. (छाया : सागर आनप)
Published on
Updated on

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी (दि.15) शिंदे गटातील 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षामध्ये खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, हेमंत घुगे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागाचे कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांच्यासह नीलेश सोनवणे, विलास सोनवणे, सागर पवार, सुनील कापडणीस, आदर्श कुलकर्णी, अर्जुन प्रजापती, ताराचंद यादव, देवेंद्र परदेशी, योगेश पाटील, रवि माळोदे, सौरभ बोरसे, गौरव गमे, प्रवीण इंगळे, विकी उशीर, दीपक ठाकरे, दीपक ठोंबरे, सागर पवार, आदित्य बोराडे, शुभम वैष्णव, संदीप भागवत यांंचा समावेश आहे. राष्ट्रवादीमध्ये केलेल्या सामाजिक कामाची दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त करत नाशिक महापालिका प्रभाग 9 व 10 मधील पदाधिकारी व सदस्य यांना सोबत घेऊन प्रवेश केल्याचे कांडेकर यांनी सांगितले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news