पिंपळनेर : विधवा प्रथाबंदी काळाची गरज; अनिसच्या वतीने ‘जागर स्त्री शक्तीचा’

पिंपळनेर :'जागर स्त्री शक्तीचा' अभियानाअंतर्गत पहिले पुष्प गुंफतांना जिल्हा प्रधान डॉ. प्रतिभा देशमुख-चौरे. (छाया: अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर :'जागर स्त्री शक्तीचा' अभियानाअंतर्गत पहिले पुष्प गुंफतांना जिल्हा प्रधान डॉ. प्रतिभा देशमुख-चौरे. (छाया: अंबादास बेनुस्कर)
Published on
Updated on

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

राज्य महिला सहभाग व सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित 'जागर स्त्री शक्तीचा' अभियानाअंतर्गत 'नवरंगी संवाद-2022' अंतर्गत अंधश्रध्दा निर्मुलन समिती पिंपळनेर यांनी मराठा पाटील मंगल कार्यालय येथे चार दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेतील पहिले पुष्प अनिस जिल्हा प्रधान डॉ. प्रतिभा देशमुख-चौरे यांनी विधवा प्रथाबंदीचा या विषयावर स्वानुभवाने कथन व सामाजिक परिपेक्षात विधवा स्त्रीयांना भोगाव्या लागणाऱ्या यातना याबाबत व्याख्यानातून कथन केले. एकविसाव्या शतकात परिवर्तनवादी विचारांची कास धरून स्रियांना जोखडातून मुक्त केले पाहिजे, यासाठी चळवळ उभी करण्याबाबत त्यांनी आवाहन केले. प्रा. एम. डी. माळी अध्यक्षस्थानी होत्या. रेखा पाटील व मनीषा भदाणे यांनी जिजाऊ वंदना गायिली. त्यानंतर अनिसच्या पुरस्कार्थींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अनिसचे अध्यक्ष सुरेंद्र मराठे, ए बी मराठे, व्ही एन जिरे, देविदास नेरकर, डी डी महाले, रिकब जैन, प्रा.पी.एच जाधव, शांताराम बिरारीस, अनिल अहिरे, प्रा.चंद्रकांत घरटे, महिला उपस्थित होत्या. प्रा. डॉ. सुरेश अहिरे यांनी प्रास्तविक केले. प्रा. शिवप्रसाद शेवाळे यांनी सूत्रसंचलन केले. मनीषा भदाणे यांनी आभार मानले.
पुरस्कार्थी असे… रत्नपुरस्कारप्राप्त सुरेंद्र मराठे, बाळशास्त्री जांभेकर आदर्श गुरुजन पुरस्कार प्राप्त प्रा. मनिषा माळी, रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळेतर्फे राज्यस्तरीय गुरूगौरव पुरस्कार प्राप्त प्रा. प्रदीप सावळे, आदर्श गुरुजन पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख शिरीष कुवर, एस. टी. सोनवणे, सुषमा भामरे अहिरे, ललिता जाधव बिरारीस, रेखा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news