पिंपळनेर : चायनिजचे दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ

पिंपळनेर : चायनिजचे दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
चायनीजचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्याकरीता मालेगाव येथे सासरी असलेल्या विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पीडितेच्या फिर्यादीनुसार चायनीजचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून तीन लाख रूपये आणावेत. याकरीता पती मुशरिफ शेख युनुस, सासरे शेख युनुस, सासू साबेरा शेख युनुस, नणंद शाहीण शेख, लहान नणंद शाबिस्ता ईकहवाल, नंदोई शेख ईकबाल (सर्व रा. मालेगाव) यांनी वेळोवेळी शारिरीक तसेच मानसिक छळ केला आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात  सहा संशयितांवर स्त्री अत्याचाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश मालचे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news