पिंपळनेर : शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप

पिंपळनेर : जन्मोत्सवानिमित सजविण्यात आलेली विलोभनीय शिवमल्ल हनुमानाची मूर्ती. (छाया: अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : जन्मोत्सवानिमित सजविण्यात आलेली विलोभनीय शिवमल्ल हनुमानाची मूर्ती. (छाया: अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील पिंपळनेर नवापूर मार्गावरील मानव केंद्राशेजारील असलेल्या शिवमल्ल हनुमान जन्मोत्सवानिमित मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पिंपळनेर : शिवमल्ल हनुमान जन्मोत्सवानिमित महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक. (छाया: अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : शिवमल्ल हनुमान जन्मोत्सवानिमित महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक. (छाया: अंबादास बेनुस्कर)

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार (दि.6) सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. अभिषेक, शिवमल्ल हनुमान यांच्या जन्मोत्सव व आरती, श्री हनुमानजी विजय ध्वज चढवणे, नैवेद्य आरती- हवन, छप्पन भोगप्रसाद व महाआरती झाल्यावर पिंपळनेरसह परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच रात्री भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी योगेश चित्ते, पियुष कोठावदे, स्वामी खरोटे यांनी सपत्नीक सकाळी अभिषेक केला. कार्यक्रम यशस्वितेसाठी सौरभ बेनुस्कर, मनीष कोठावदे, निरंजन जगताप, उदय पाटील, भैय्या कोतकर, तन्मय कासार, प्रणय बागड, दक्ष धोबी, दादू नेरकर, शेखर सिररसाठ, भगवा चौक मित्र मंडळ, शिव छत्रपती मित्र परिवार, पाटील गल्ली, प्राणीन फाउंडेशन, गोरक्षक विभाग-पिंपळनेर, विजू नाना युवा मंच, रिखब जैन मित्र परिवार तसेच मयूर कासार, भरत जगताप, गुरू पाटील, पियुष कोठावदे, रोहित गवळे, मल्याचा पाडा मित्र परिवार, मोहित जैन, स्वामी खरोटे, चेतन ढोले, अक्षय पगारे, अक्षय मोडोळे, पंकज वानखेडे, नंबर वन ग्रुप, दिनेश कुंभार, प्रीतम पाटील, अविनाश चाळसे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news