नाशिक शहरात देशी प्रजातीची एक लाख झाडे लावणार

नाशिक शहरात देशी प्रजातीची एक लाख झाडे लावणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरात देशी प्रजातीच्या वृक्षलागवडीसाठी तब्बल एक लाख रोपे तयार करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. जेतवननगर येथील स्वमालकीच्या नर्सरीमध्ये ही रोपे तयार केली जाणार असून, या रोपांचे संगोपन नेटकेपणाने होण्यासाठी नागरिकांकडून अनामत रक्कमही स्विकारली जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली.

पाच वर्षांपूर्वी वृक्षगणनेत नाशिक महापालिका क्षेत्रात विविध प्रजातीचे समारे ४९ लाख वृक्ष आढळून आले होते. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमधील वृक्षसंपदा अधिक असली तरी त्यात देशी प्रजातीच्या झाडांची संख्या कमी असल्याचे या वृक्षगणनेतून समोर आले. निलगिरी, गुलमोहर, बुच, रेन ट्री, पॅपोरिया या धोकेदायक वृक्षांची संख्या अधिक अधिक आढळून आली. आता नव्याने वृक्षगणनेसाठी अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. अंतिम वृक्षगणनेनंतर देशी वृक्षांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट झाले होते. नागरिकांकडून महापालिकेच्या नर्सरीकडे सातत्याने देशी वृक्षांची मागणी झाली. परंतू देशी प्रजातीच्या झाडांची रोपे महापालिकेकडे उपलब्ध नव्हती. शहरातील नर्सरी चालकांकडून देखील देशी झाडांचा पुरवठा कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने एक लाख देशी वृक्षांची रोपे लागवड केली जाणार आहेत. जेतवननगर येथे महापालिकेच्या नर्सरीमध्ये देशी वृक्षांचे रोपे तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत एक लाख रोपे तयार करून नागरिकांना लागवडीसाठी दिली जाणार आहे.

देशी वृक्षांची लागवड करणार

वड, पिंपळ, उंबर, मोहा, चिते, बेल, हिरडा, बेहडा, अमलतास, कवट, आंबा, आवळा, बांबु, करंज, पापडा, हळद, कळंब.

देशी लागवडीसाठी अनामत

देशी वृक्षांच्या लागवडीसाठी महापालिकेकडून नागरिकांना रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे. या रोपांची लागवड व संगोपन नेटकेपणाने होण्यासाठी महापालिका नागरिकांकडून अनामत रक्कम स्विकारणार आहे. सहा महिन्यानंतर रोपाचे संगोपन व्यवस्थित होत असल्याचे फोटो दाखविल्यानंतर नागरिकांना अनामत रक्कम परत दिली जाणार आहे.

देशी वृक्ष लागवडीसाठी महापालिका स्वत:च्या नर्सरी मध्ये एक लाख रोपे तयार करणार आहे. पुढील वर्षात पावसाळ्यापुर्वी देशी रोपांचे अनामत ठेव घेऊन वाटप केले जाणार आहे.

– विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक महापालिका.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news