नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराला सुरुवात

नाशिक कपालेश्वर महादेव मंदिर,www.pudhari.news
नाशिक कपालेश्वर महादेव मंदिर,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
रामकुंडाजवळील प्राचीन श्री कपालेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार कामास मंगळवारी (दि. 15) प्रत्यक्ष सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात मंदिरास गळती लागत होती. तसेच अनेक ठिकाणी मंदिराचे बांधकाम जीर्ण झाल्याने मंदिराची होणारी झीज थांबविण्यासाठी मंदिर प्रशासनाने रीतसर टेंडर काढून मंदिर जीर्णोद्धार कामास सुरुवात केली.

घुमट व सभामंडपातून पावसाळ्यात पाणी झिरपत असल्याने तसेच दगड जीर्ण झाल्याने, त्यांस तडे पडल्याचे पुजारी तसेच भाविक भक्तांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर प्रशासनाने मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यात मंदिराचे दगडी चिरे काही ठिकाणी ठिसूळ झाल्याचे व काही ठिकाणी बांधकाम कमकुवत होऊन गळती लागली असल्याचे समोर आले. तसेच या पुरातन मंदिराचे पावित्र्य तसेच ऐतिहासिक वास्तू जतन करण्याच्या दृष्टीने जीर्णोद्धार करणे गरजेचे असल्याने काम हाती घेण्याचा निर्णय विश्वस्त तसेच भाविकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. पावसाळा संपल्याने सोमवारी विधिवत पूजन करण्यात आले व मंगळवारी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. जीर्णोद्धाराचे काम अंदाजे पाच ते सहा महिने सुरू राहणार असून या कामासाठी 40 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. यावेळी विश्वस्त मंडलेश्वर काळे, प्रमोद देसाई, पद्माकर पाटील, दिनेश वैद्य, सचिन डोंगरे, नंदू पवार, अतुल शेवाळे, सुनील महांकाळे, प्रमोद देसाई, पद्माकर पाटील, नंदू मोठे, अभिजित गाडे, सुनील शिनगान, संकेत मुर्तडक, गणेश बनछोडे, नितेश विश्वकर्मा व भाविक उपस्थित होते.

वादासही सुरुवात :

बांधकाम सुरू झाले असल्याने, दुपारच्या सुमारास मंदिर विश्वस्त कार्यालयात विश्वस्त व मंदिराचे गुरव पुजारी यांच्यात वाद झाला. त्यांनी विश्वस्त कार्यालयात जाऊन मंदिर प्रशासनाने भाविकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news