

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कपाळावरील चंद्रकोरीप्रमाणे आकाशात दिसणारा लख्ख चंद्र अन् शुक्र ग्रह यांच्या अनोख्या युतीचा अद्भुत नजारा शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी नाशिककरांनी अनुभवला.
सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला आकाशात आपल्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी ही खगोलीय घटना पाहायला मिळाली. ही अनोखी खगोलीय घटना म्हणजे चैत्र शुक्लेच्या तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रह यांची युती होय. आकाशात चंद्रकोरीच्या बरोबर खाली शुक्राची तेजस्वी चांदणी पाहण्याचे विलोभनीय दृश्य अनेकांनी अनुभवले. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे कपाळावर चंद्रकोर लावत वा मराठमोळ्या स्त्रिया आजही सौभाग्याचे कुंकू म्हणून कपाळावर ज्याप्रमाणे चंद्रकोर लावतात, अगदी तशीच आजची ही चंद्रकोर आणि त्या खाली तेजस्वी शुक्राची चांदणी आकाशात दिसत होती. या खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी सायंकाळी ७.१५ ते ८:१५ या काळात नाशिकरांनी मोकळ्या मैदानांसह घराच्या छतावर गर्दी केली होती.
हेही वाचा :