

नाशिक : जिल्हा परिषदेत महिलांशी गैरवर्तन प्रकरणाचा गौप्यस्फोट झाल्यानंतर आरोग्य विभागातंर्गत तालुकापातळीवर आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या.
प्राप्त तक्रारींमध्ये पेठ तालुक्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात तालुका विशाखा समितीने चौकशी करून अहवाल सादर केला होता. संबंधित अहावालाच्या आधारे प्रशासनाने त्यांच्यावर गुरूवारी (दि.17) निलंबनाची कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यांसमवेत एका कर्मचाऱ्यांचे देखील निलंबनाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेतील मुख्यलायातील काही विभागप्रमुखांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांची विशाखा समितीकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. मात्र, या प्रकरणानंतर गैरवर्तनबाबत महिला कर्मचा-यांकडून तक्रारी येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथून सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. येथील वैद्यकीय अधिका-यांकडून मिळत असलेल्या वागणूक, छळ याबाबत तक्रारी असल्याचे खुद्द मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले होते.
यात पेठ तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात अत्यंत गंभीर तक्रार प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची पेठ तालुका विशाखा समितीन देखल घेऊन चौकशी केली. समितीने चौकशी करून अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला. यात संबंधित वैद्यकीय अधिका-यांसह एका कर्मचा-यांवर दोषीचा ठपका ठेवण्यात आला. त्याआधारे आरोग्य विभागाने गुरूवारी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मित्तल यांच्याकडे दाखल केला होता. त्यानुसार संबंधित वैद्यकीय अधिकारी यांसह एका कर्मचा-यांचे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्मचारी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला दाखल केला आहे. या कारवाईने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.