

नाशिक : जिल्हा परिषदेतील तीन बड्या विभाग प्रमुखांविरोधात महिला कर्मचाऱ्यांनी विशाखा समितीकडे तक्रार नोंदविली आहे. महिला कर्मचाऱ्नी यांनी केलेल्या या तक्रारी जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या प्राप्त झालेल्या तक्रारींवर विशाखा समितीकडून या अधिकाऱ्यांची चौकशी झाली असून, समिती आपला अंतिम अहवाल दिला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, विशाखा समितीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण मिळावे, म्हणून मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समिती (विशाखा) आहे. दैनंदिन कामकाज करताना महिला कर्मचा-यांना लैंगिक छळ करण्याचा प्रकार काही अधिकारी व कर्मचा-यांकडून होतो. त्याबाबत संबंधित महिला विभागप्रमुखांसह विशाखा समितीकडे तक्रारी करत असतात. प्रसंगी फौजदारी तक्रारही दाखल करतात. जिल्हा परिषदेत कार्यरत विशाखा समितीकडे विभागांमध्ये कार्यरत महिला कर्मचा-यांनी विभागप्रमुखांविरोधात तक्रारी केल्या आहेत. असे तीन अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात या तक्रारी आल्या आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींवरून विशाखा समितीने
मंगळवारी (दि.1) नाशिक पंचायत समितीच्या कार्यालयात चौकशी केल्याचे वृत्त आहे. संबंधित तक्रारदारांना यावेळी बोलावून घेत त्यांच्या तक्रारींची यावेळी बंद दरवाजाआड चौकशी करण्यात आल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. सकाळपासून ही चौकशी सुरू होती. यात तक्रारदार असलेल्या विभागातील अन्यही कर्मचा-यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.