Youths start night patrolling in 33 villages to stop thefts | चोरी-घरफोडी रोखण्यासाठी ३३ गावांत तरुणांची 'रात्रगस्त'

वावी पोलिसांचा पुढाकार; ३२७ तरुण मध्यरात्री १२ ते पहाटे ४.३० पर्यंत सुरक्षेसाठी तैनात
वावी : पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत तरुणांचे ग्राम रक्षक दल.
वावी : पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत तरुणांचे ग्राम रक्षक दल.
Published on: 
Updated on: 

वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये चोरी, घरफोडी आणि पशुधन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वावी पोलिसांनी ग्राम रक्षक दलाच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेतली आहे. परिसरातील ३३ गावांमधील तब्बल ३२७ तरुणांनी गावांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली असून, दररोज मध्यरात्री १२ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत गस्त घातली जात आहे.

पूर्व भागात अलीकडे चोरी व घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर वावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी ग्राम रक्षक दल पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला. त्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

गावातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा, वर्दळीची ठिकाणे, शेतशिवार आणि प्रवेशद्वारांवर गस्त घातली जात आहे. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. डी. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक विमला एम. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

ग्राम रक्षक दलातील तरुणांना पोलिसांकडून मार्गदर्शन केले जात असून, सरपंच आणि पोलिसपाटील यांचाही सहभाग आहे. पोलिस-जनता समन्वयातून ग्रामीण भागातील सुरक्षा अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे

वावी गावातील तरुणांना एकत्र करून ग्राम सुरक्षा दलाची स्थापना लवकरच करण्यात येणार असून गावातही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तरुणांचं सहकार्य पोलिसांना मिळाल्यास गावात कुठल्याही प्रकारे दहशत चोरी होणार नाही अशी काळजी आम्ही नक्कीच घेऊ.

- भास्कर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वावी

वावी गावातही ग्राम सुरक्षा दल कार्यरत

वावी गावातील तरुणांना एकत्र करून लवकरच ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात येणार आहे. तरुणांचे सहकार्य मिळाल्यास गावात चोरी व दहशतीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सांगितले.

वावी : पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत तरुणांचे ग्राम रक्षक दल.
Nashik Phata Road Potholes: नाशिक फाटा चौकात खड्ड्यांची ‘मलमपट्टी’! सिमेंटचे गट्टू टाकल्याने वाहतूक मंदावली, अपघाताचा धोका

संशयास्पद हालचालींची माहिती द्या !

३३ गावांतील ३२७ तरुणांच्या सहभागामुळे मोहिमेला बळ मिळाले आहे. नागरिकांनीही सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वावी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वावी : पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत तरुणांचे ग्राम रक्षक दल.
Nashik Simhastha Kumbh Mela 2027| सिंहस्थ स्वागतासाठी 'नाशिक महोत्सव'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.