Nashik Simhastha Kumbh Mela 2027| सिंहस्थ स्वागतासाठी 'नाशिक महोत्सव'

सिंहस्थ स्वागतासाठी 'नाशिक महोत्सव'
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी जुने नाशिक प्रतिष्ठानच्या वतीने १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान 'नाशिक महोत्सव २०२६'चे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, संगीत, संस्कृती आणि सामाजिक कृतज्ञतेचा संगम असलेल्या या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम १४ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता गौरी पटांगण, गंगाघाट येथे होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्यासह नाशिकचे कलाकार भक्तिमय संगीताची मेजवानी सादर करणार आहेत.

महोत्सवाच्या निमित्ताने १२ व १३ नोव्हेंबरला यशवंत महाराज पटांगण, रामकुंड येथे गायन स्पर्धेच्या ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून निवडलेल्या तीन उत्कृष्ट गायकांना अवधूत गुप्ते यांच्या व्यासपीठावर हजारो प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. १४ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात हर्षवर्धन वावरे, आदित्य पाटेकर, सोनाली सोनवणे आणि कस्तुरी साईराम सहभागी होणार आहेत. पारंपरिक अभंग-भजन आणि आधुनिक संगीताचा संगम असलेला 'भजन क्लबिंग' हा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Gutkha Seizure In Ghargaon: नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याचा मोठा साठा जप्त; १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

यावेळी ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक गजानन (नाना) शेलार यांना 'लोकनेते पुरस्कार', तर आयएएस अधिकारी स्वप्निल पवार यांना 'जुने नाशिक गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. पवार यांच्या आई-वडिलांचाही विशेष सन्मान होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांसह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. जुन्या नाशिकचा ऐतिहासिक वारसा, पुनर्विकास, नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्न शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचाही महोत्सवाचा उद्देश असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदन भास्करे यांनी दिली.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका स्वीकृत नगरसेवकपद निवडणूक; काँग्रेसने दाखल केलेला अकरावा अर्ज छाननी समितीतून अधिकृतपणे फेटाळला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.