Nashik News | देशासाठी मार्गदर्शक ठरतील अशी कामे करा

Nashik News | महास्ट्राइड मूल्यांकन समितीच्या बैठकीत जागतिक बँकेच्या प्रतिनिधी सीमा व्यास यांची सूचना
Nashik News | देशासाठी मार्गदर्शक ठरतील अशी कामे करा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील विकासकामे राज्यासाठी नव्हे, तर देशासाठी मार्गदर्शक ठरतील, अशी करा, अशा सूचना जागतिक बँकेच्या प्रतिनिधी सीमा व्यास यांनी बैठकीत दिल्या. जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प (महास्ट्राइड) नाशिक जिल्हा मूल्यांकन समितीची बैठक झाली. तत्पूर्वी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध विकासकामांना भेट देत पाहणी केली.

Nashik News | देशासाठी मार्गदर्शक ठरतील अशी कामे करा
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना 'कामगार दिना'ची भेट! वैद्यकीय भत्त्यात 1000 वरून थेट 3000 रुपयांची वाढ

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ही बैठक झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राकेश सेपट, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. धर्माधिकारी, जागतिक बँकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा, सीमा व्यास, महास्ट्राइडचे महाव्यवस्थापक दीपक देशमुख यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात जागतिक बँकेच्या प्रोत्साहनात्मक निधीच्या माध्यमातून होणारी विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील, अशी ग्वाही देत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक जिल्हा कृषी, कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग, औद्योगिक, ऊर्जानिर्मितीसह विविध उत्पादनात अग्रेसर आहे. आगामी काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात रस्ते, रेल्वे, विमानतळ सक्षमीकरण करून पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो. आगामी काळात नाशिक हे वाढवण बंदराशी जोडले जाणार आहे. तसेच निफाड येथे ड्रायपोर्ट विकसित होत आहे. अलीकडेच विविध उद्योजकांशी औद्योगिक गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आले.

रिंगरोडच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन, आध्यात्मिक पर्यटनाला या जिल्ह्यात मोठी संधी आहे. त्यातून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. नांदरमधमेश्वर पक्षीअभयारण्य या जिल्ह्यात आहे, तर बिबट सफारीचा उपक्रम नियोजित आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) माध्यमातून गेल्या वर्षी ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. यावर्षीच्या जानेवारीमध्ये एअर-शो, तर मार्चमध्ये कृषी कुंभचे आयोजन करण्यात आले होते.

Nashik News | देशासाठी मार्गदर्शक ठरतील अशी कामे करा
Instagram Fraud Case | मैत्रीला काळिमा! इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून 14 वर्षीय मैत्रिणीला 15 लाखांना लुटले

जिल्ह्यात विकासकामे करताना जागतिक बँकेने केलेल्या सूचनांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल. विकासकामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची सर्वतोपरी दक्षता घेण्यात येईल. तेथे कामगारांना सुरक्षेची सर्व साधने पुरविण्यात येतील. त्याची कामगार आयुक्तांकडून खात्री करून घेण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या

जागतिक बँकेच्या प्रतिनिधी सीमा व्यास यांनी सांगितले की, जागतिक बँक शाश्वत विकासासाठी मदत करते. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेली कामे केवळ राज्यासाठी नव्हे, तर देशासाठी मार्गदर्शक अशी आहेत. विकासकामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशीही सूचना त्यांनी केली. यावेळी स्वाती डोग्रा यांनीही विविध सूचना केल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news