Nashik Municipal Corporation | नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना 'कामगार दिना'ची भेट! वैद्यकीय भत्त्यात 1000 वरून थेट 3000 रुपयांची वाढ

Nashik Municipal Corporation | महापौर हिमगौरी आहेर यांची घोषणाः तब्बल 13 वर्षांनंतर भरीव वाढ
Nashik Mayor Reservation
नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कामगारदिनाचे औचित्य साधून महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे व आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

Nashik Mayor Reservation
Instagram Fraud Case | मैत्रीला काळिमा! इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून 14 वर्षीय मैत्रिणीला 15 लाखांना लुटले

कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय भत्ता दरमहा एक हजारावरून तीन हजार रुपये करण्यात आला आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत महापौर आहेर-आडके यांनी ही घोषणा केली. मनपातील बहुतांश कर्मचारी ५० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील असून, कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे अनेकांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे.

कामाच्या वाढत्या तणावामुळे अनेक कर्मचाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असून, उपचार व औषधांवर मोठा खर्च होत आहे. वाढत्या महागाईमुळे वैद्यकीय खर्चातही मोठी वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपा कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये दरमहा वैद्यकीय भत्ता दिला जात होता.

Nashik Mayor Reservation
Rupali Chakankar ED Summons | मोठी बातमी! रूपाली चाकणकर यांना ईडीचे समन्स; 14 मे रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश

परंतु ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात होती. मार्च २०२६ रोजीच्या महासभेत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांचा पाठपुरावा सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, मनपा कर्मचाऱ्यांना आता एक हजारऐवजी तीन हजार रुपये वैद्यकीय भत्ता दिला जाणार आहे. महापौरांच्या या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मनपा कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय भत्त्यात वाढीची जुनी मागणी होती. आयुक्तांसह सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेत वैद्यकीय भत्ता वाढीच्या महासभेच्या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- हिमगौरी आहेर-आडके, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news