Nashik Crime | जादूटोण्याच्या नावाखाली विवाहितेला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न, पतीसह तिघांवर गुन्हा

file photo
Published on
Updated on

नाशिक : नावाखाली जादूटोण्याच्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिचे स्त्रीधन बळकावणे, मंतरलेली पुडी ठेवून त्रास देणे आणि अखेरीस फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पती, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime | जादूटोण्याच्या नावाखाली विवाहितेला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न, पतीसह तिघांवर गुन्हा
Weapon License Application Delays |शस्त्र परवान्यांना लालफितीचा अडसर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च ते २ जून २०२६ या कालावधीत अमरावती येथील बारब्दे लेआऊट, देवमाळी तसेच हैदराबादमधील कोंडापूर परिसरातील निवासस्थानी फिर्यादी विवाहितेचा सातत्याने छळ करण्यात आला. घरगुती कारणांवरून मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक त्रास देत तिचे सोन्या-चांदीचे बळकावल्याचा आरोप आहे. दागिने तसेच, पतीने धोंड्यासाठी सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर, मंतरलेली पुडी पर्समध्ये ठेवून जादूटोण्याच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, २९ जून २०२६ रोजी फिर्यादीला फर्शी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे फिनेल पाजून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते पुढील तपास करीत आहेत. आरोपी अद्याप फरार असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

Nashik Crime | जादूटोण्याच्या नावाखाली विवाहितेला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न, पतीसह तिघांवर गुन्हा
Nashik | करबुडव्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन' मोहीम

भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्यातील भोंदूगिरीचा हा ९ वा गुन्हा दाखल झाला आहे. राज्यातील हे प्रमाण प्रथम स्थानावर आहे. सदर गुन्ह्यातील भोंदूला शोधून ताबडतोब अटक करावी, अशी मागणी अंनिस करत आहे

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news