Nashik husband's organ donation | पतीच्या अवयवदानातून पत्नीने उजळवली अनेकांची दिवाळी

शेतमजुराच्या पत्नीने घेतला अवयवदानाचा निर्णय
organ donation
organ donation
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घराघरांत दिवाळीच्या पणत्या उजळत असताना नांदूरमध्यमेश्वर येथील माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रावसाहेब माळी या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. मात्र, पतीच्या मृत्यूने कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातही पत्नीने माणुसकीचा दीप विझू दिला नाही. स्वतःच्या आयुष्यात अंधार पसरला असताना, दुसऱ्यांच्या घरात प्रकाश फुलवण्याचा निर्णय घेत माळी कुटुंबाने मृताचे अवयवदान केले.

organ donation
Nashik Simhastha Kumbh Mela 2027| सिंहस्थ स्वागतासाठी 'नाशिक महोत्सव'

शेतमजूर कुटुंबातील रावसाहेब माळी या तरुणाचा रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मेंदू मृत झाला. घराचा आधार, जीवनसाथी आणि आई-वडिलांचा मुलगा काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर रावसाहेब यांना आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. रावसाहेब यांचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरँनी घोषित केले.

organ donation
Nashik Phata Road Potholes: नाशिक फाटा चौकात खड्ड्यांची ‘मलमपट्टी’! सिमेंटचे गट्टू टाकल्याने वाहतूक मंदावली, अपघाताचा धोका

याप्रसंगी अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले. अवयवदानाचे महत्त्व, त्यातून वाचू शकणारे जीव आणि अनेक कुटुंबांना मिळू शकणारा आनंद यांची माहिती दिली. पतीला गमावण्याचे दुःख ताजे असतानाही पत्नी मीना माळी यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. आई-वडील आणि अन्य नातेवाइकांनीही यास संमती दिली. मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, संस्थेचे पदाधिकारी व डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदानाची प्रक्रिया झाली.

खालील ठिकाणी अवयव खाना

मृत रावसाहेब माळी यांचे हृदय एअर कॉरिडॉरद्वारे मुंबई येथील एच. एन. रुग्णालयात, यकृत पुणे येथे प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. एक मूत्रपिंड मविप्र रुग्णालयात तर दुसरे मूत्रपिंड नाशिकमधीलच नाइन पर्ल हॉस्पिटलला देण्यात आले. नेत्र मविप्र रुग्णालयास तर त्वचेचे नेहेते रुग्णालयात दान करण्यात आले.

माझ्या आयुष्यात या दिवाळीत अंधार आला आहे. पण माझ्या ● पतीच्या अवयवांमुळे इतरांच्या आयुष्यात प्रकाश पडणार असेल तर त्यापेक्षा मोठे समाधान कोणते. माझ्या पतीच्या शरीराची माती किंवा राख करण्यापेक्षा त्याच्या अवयवांमुळे कुणाला तरी नवे जीवन मिळावे, हीच माझी इच्छा आहे.

- मीना माळी, रावसाहेब यांच्या पत्नी

कुटुंबावर र दुःस दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही मृताच्या नातेवाइकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय अत्यंत समाजोपयोगी, प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे.

- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.