Ramkal Path Project | रामकाल पथ प्रकल्पांतर्गत 'वेंडिंग झोन' उभारणार

स्थाRamkal Path Project | यीची मंजुरी: काळाराम, कपालेश्वर मंदिर परिसरासाठी १२ कोटी
Ramkal Path Project
Ramkal Path Project
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी 'रामकाल पथ' प्रकल्पांतर्गत पंचवटीतील काळाराम मंदिर आणि कपालेश्वर मंदिर परिसरात वेंडिंग झोनसह विविध नागरी सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रस्तावित १२ कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पंचवटीतील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या परिसराचा विकास होण्याबरोबरच भाविक व पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Ramkal Path Project
ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई

केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून नाशिकमध्ये १४६.१० कोटी रुपयांचा 'रामकाल पथ' प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ९९.१६ कोटी रुपये प्राप्त झाले असून, उर्वरित ४६.४४ कोटी रुपये राज्य शासन आणि महापालिकेच्या सहभागातून उपलब्ध करून दिले जात आहेत. मार्च २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.

'क्लिन गोदावरी बॉण्ड २०३०'च्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या १२ कोटी रुपयांच्या निधीतून दोन्ही मंदिर परिसरातील विकासकामे केली जाणार आहेत. त्यानुसार, काळाराम मंदिर परिसर वेंडिंग झोन आणि नागरी सुविधांच्या विकासासाठी सात कोटी रुपये, तर कपालेश्वर मंदिर परिसर वेंडिंग झोन आणि सुविधा इमारतीच्या उभारणीसाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 'स्कायवे इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्राइवेट लिमिटेड' या नियुक्त कंट्राटदाराला १२ कोटी रुपयांची कामे देण्यास व त्यासंदर्भात करारनामा करण्यास मनपा स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Ramkal Path Project
Godavari River Pollution | गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नाशिक मनपा आयुक्तांना कडक निर्देश

'रामकाल पथ'वर विविध सुविधा उभारणार

रामकाल पथ प्रकल्पांतर्गत पंचवटी परिसर, सीतागुंफा, काळाराम मंदिर परिसर, श्रीराम उद्यान ते रामकुंड रस्ता तसेच अहिल्याबाई होळकर पूल ते गाडगे महाराज पूल या दरम्यानच्या गोदावरी नदीकाठाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात लेझर शो, पाण्याचे कारंजे, बोटीची सुविधा, तात्पुरते निवारणगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुसज्ज पार्किंग यांचा समावेश आहे. तसेच रामकुंडावर स्नानासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

'वेंडिंग झोन' म्हणजे काय?

'वेंडिंग झोन' म्हणजे फेरीवाला क्षेत्र होय. महापालिकेने रस्त्यावरील विक्रेते, भाजीवाले आणि पथ विक्रेत्यांना कायदेशीररीत्या व्यवसाय करण्यासाठी ठरवून दिलेली किंवा आरक्षित केलेली जागा होय.

नो व्हेहिकल, नो प्लास्टिक झोन

परिसर 'नो व्हेहिकल झोन' आणि 'नो प्लास्टिक झोन' म्हणून विकसित करण्याची योजना असून, रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित म्युरल्स, पुतळे, भित्तिचित्रे, कमान, दीपस्तंभ आणि आकर्षक विद्युत रोषणांच्या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पंचवटीतील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याच्या सोबतच भाविक आणि पर्यटकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news