ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई

ED Raids IVF Centers | 29 लाखांची रोकड जप्त; बँक लॉकर, म्युच्युअल फंड गुंतवणूक गोठवली
Mumbai IVF Treatment
Mumbai IVF TreatmentPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना प्रलोभने दाखवून स्त्रीबीज मिळवण्याच्या कथित तस्करी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (दि. २२) नाशिकसह ठाणे आणि बारामती येथे छापेमारी केली. मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत रुग्णालये, आयव्हीएफ केंद्र आणि अन्य ठिकाणांसह एकूण १० ठिकाणी शोधमोहीम राबवली. या कारवाईत २९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

Mumbai IVF Treatment
Nashik Smart City | नाशिक स्मार्ट सिटीच्या 4.23 कोटींच्या अखर्चित निधीवरून केंद्र व राज्य शासनाचा जाब

बँक लॉकर आणि म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक गोठवण्यात आली आहे. दरम्यान, आयव्हीएफ सेंटरचा संचालक अमोल पाटील यांच्या घरची तपासणी करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा आणि आरोपपत्राच्या आधाराने ईडीने आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात मंजूषा वानखेडे यांच्यासह अन्य १६ जणांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, सहायक पुनरुपादक तंत्रज्ञान नियमन कायदा आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत.

Mumbai IVF Treatment
Godavari River Pollution | गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नाशिक मनपा आयुक्तांना कडक निर्देश

तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्त्रीबीज दानासाठी प्रलोभने दाखवून एजंटमार्फत विविध आयव्हीएफ केंद्र आणि एआरटी बँकांपर्यंत पोहोचवले जात होते.
त्या बदल्यात महिलांना आणि मध्यस्थांना आर्थिक मोबदला दिला जात असल्याचा संशय आहे. दरम्यान, छाप्यांत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news