Illegal Weapons Seized | दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक; शस्त्रविक्रेता फरार

दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक; शस्त्रविक्रेता फरार
मालेगाव : एमडी पावडर व अटक केलेल्या आरोपीसह पोलिस पथक.
मालेगाव : एमडी पावडर व अटक केलेल्या आरोपीसह पोलिस पथक.
Published on
Updated on

मालेगाव : पवारवाडी पोलिसांनी अपर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या मदतीने मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील ओवाडी नाला पुलाखाली कारवाई करीत दोन गावठी बनावटीचे कट्टे, तीन जिवंत काडतुसे आणि मॅगझीनसह ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, शस्त्रांची विक्री करणारा संशयित फरार झाला. ही बेकायदेशीर शस्त्रे मध्य प्रदेशातून मालेगावात आणली जात असल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ८) रात्री ओवाडी नाला परिसरात काही जण गावठी कट्टे बाळगून फिरत असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यावर पवारवाडी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत नवाज अशरफ सिराज अहमद (३६, रा. फिरोजाबाद, पवारवाडी) आणि मोहम्मद रिहान निहालुद्दीन (३२, रा. करीमनगर, मालेगाव) यांच्याकडून प्रत्येकी एक गावठी कट्टा, मॅगझीन आणि एकूण तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दरम्यान, हिबजुरहमान (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा. मालेगाव) हा संशयित पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाला. तोच या दोघांना गावठी कट्टयांची विक्री करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्राथमिक तपासात ही शस्त्रे मध्य प्रदेशातील उमरठी परिसरातून विक्रीसाठी मालेगावात आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविली असून फरार संशयिताचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी पोलिस शिपाई रवींद्र काळे यांच्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत राकेश उबाळे, विनोद चव्हाण, उमेश खैरनार, नवनाथ शेलार, नीलेश निकम, संतोष सांगळे, रवींद्र काळे यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

डिडा कॉलनीत एकाला अटक

अवैधरीत्या गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकाला किल्ला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई येथील डिडा कॉलनीत केली. याप्रकरणी इरफान मोहम्मद इस्माईल (३८, रा. इस्लामपुरा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल, चार हजार किमतीचे जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला. परवाना नसताना अग्रिशस्त्र बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमडी पावडरसह एकाला अटक

मालेगाव : माल्हणगाव शिवारात एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विक्रीसाठी येणाऱ्या संशयितावर अपर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने व मालेगाव तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत एकाला अटक केली. संशयिताकडून २५.२९ ग्रॅम एमडी पावडरसह मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ८८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मालेगाव : एमडी पावडर व अटक केलेल्या आरोपीसह पोलिस पथक.
Nashik Ring Road - रिंगरोड अलाइनमेंट वादात भर

अतिक अहमद सलीमुद्दीन शेख (रा. ६० फुटी रोड, मालेगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. माल्हणगाव शिवारातील जिंदा बाबा दग्र्याजवळील फ्याच्या शेडमध्ये तो एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या पथकाने सापळा स्चून संशयिताला ताब्यात घेतले.

संशयिताची झडती घेतली असता, त्याच्या दोन्ही खिशांत सुमारे ५० हजार रुपये किमतीची २५.२९ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. ही अमली पदार्थाची पावडर तो परिसरात विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून एमडी पावडर, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ८८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलिस हवालदार सचिन भामरे यांच्या फिर्यादीवरून मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ९) संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले.

मालेगाव : एमडी पावडर व अटक केलेल्या आरोपीसह पोलिस पथक.
Nashik | सिंहस्थ काळात उभारणार ५६ हजार तात्पुरती स्वच्छतागृहे

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रीती सावंजी करीत आहेत. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलिस हवालदार जिभाऊ पवार, अविनाश राठोड, अमलदार योगेश गुंजाळ, रजनीकांत मोरे आदींचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news