Nashik investment news-दोन आयटीसह डिफेन्स कंपनी नाशिकमध्ये गुंतवणुकीस उत्सुक

आज करार शक्य : हजारो कोटींची गुंतवणूक, रोजगाराला मिळणार बूस्ट
Nashik investment news
Nashik investment newspudhari
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

गुंतवणुकीसाठी हॉट डेस्टिनेशन उरत असलेल्या नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन आवटी व एक आंतरराष्ट्रीय डिफेन्स कंपनी नाशिकमध्ये गुंतवणुकीस उत्सुक असून, बुधवारी (दि. ६) होणाऱ्या कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक समिटमध्ये माचाकाचा सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपन्यांकडून १० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार असल्यामुळे रोजगाराला मोठा बृष्ट मिळणार आहे.

Nashik investment news
Nashik TCS Case | नाशिक टीसीएस प्रकरणाला 'टेरर' कनेक्शन? फरार निदा खानचा दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संपर्क

मागील काही वर्षापासून नाशिकच्या उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ सुरू असून, २०२४ २५ मध्ये नाशिकमध्ये १६ हजार १११ कोटींची गुंतवणूक आली. त्यातून ७ हजार ५६६ रोजगारनिर्मिती झाली. या गुंतवणुकीत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, ग्राफाइट, व्हर्चुओसो ऑप्टी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., एपिरॉक एबी, पैरासन माशीनरी प्रा. लि. यांसारख्या बड्या उद्योग समूहांचा समावेश आहे. दरम्यान, आणखी तीन मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या नाशिकमध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात दीन आयटी कंपन्या असून, गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट-२०२६ मध्येच या गुंतवणुकीचे सूतोवाच करण्यात आले होते. या दोन्ही बठया आयटी कंपन्यांकडून भारतात एआय प्रकल्पासाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे.

या प्रकल्पातून एआय, क्लाउड आणि डेटा सेंटरसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. या दोन्ही कंपन्या जागतिक स्तरावर अत्यंत नामांकित आहेत. या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या आयटी क्षेत्राला मोठा बूस्ट मिळणार आहे.

Nashik investment news
Nashik Kumbh Mela | सिंहस्थाच्या कामात अडथळे? नाशिक महापालिकेची सारवासारव; 'सगळं काही आलबेल' असल्याचा दावा

याशिवाय, एका आंतरराष्ट्रीय संरक्षण उत्पादक कंपनीकडूनदेखील नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. या कंपनी व्यवस्थापनासमवेत बोलणी सुरू असून, व्यवस्थापनाने सकारात्मकता दर्शविली आहे. दरम्यान, या तिन्ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांसमवेत कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले जाण्याचा अंदाज आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मंगळवारी (दि. ५) जोरदार प्रयत्न केले जात होते.

३०० प्रकल्पांकडून करार

कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक समिट ३०० उद्योगांकडून तब्बल १५ हजार कोटीचे सामंजस्य करार केले जाणार आहेत. यामध्ये एबीबी २०० कोटी, क्रॉम्प्टन ३५० कोटी, राइट टाइट फास्टनर १५० कोटी, डब्ल्यूटीसी या आवटी कंपनीकडून ७०० कोटी, इनोव्हा रवर्स २४० कोटी यांसारख्या बढ़या ज्योग समूहांचा समावेश आहे. याशिवाय, बेस्टीन हॉटेल्सकडून २०० कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला जाणार आहे. यातील १० गुंतवणूकदारांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news