Nashik TCS Case | नाशिक टीसीएस प्रकरणाला 'टेरर' कनेक्शन? फरार निदा खानचा दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संपर्क

Nashik TCS Case | नाशिकमधील 'टीसीएस' प्रकरणाला गंभीर वळण
Nida Khan news |
Nida Khan news | निदा खानचे डॉ. शाहीन कनेक्शन!
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण व कथित धर्मांतर प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील प्रमुख संशयित एचआर मॅनेजर निदा खान सध्या फरार असून, तपासादरम्यान तिचा संबंध दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी डॉ. शाहीन शाहिद हिच्याशी संपर्क असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने आता अधिकच गंभीर वळण घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

Nida Khan news |
Nashik Conversion Case: नाशिक 'TCS' धर्मांतर प्रकरणातील धक्कादायक Video समोर; हिंदू तरुणाला बीफ खाण्यासाठी, नमाज पठणासाठी भाग पाडले?

टीसीएस कंपनी प्रकरणात आतापर्यंत नऊ महिला कर्मचाऱ्यांनी सहा आरोपींविरोधात लैंगिक शोषण, छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप करत गुन्हे दाखल केले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारीनुसार, कंपनीत वरिष्ठांकडून गैरवर्तन, अयोग्य स्पर्श, अश्लील टिप्पणी, पाठलाग अशा प्रकारचा छळ सातत्याने होत होता. या सर्व तक्रारी एचआरकडे देऊनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप निदा खानवर करण्यात आला आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, कंपनीत महिलांना लक्ष्य करण्यासाठी ठरावीक पद्धतीने जाळे तयार करण्यात आले होते. काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निदा खान महिलांचे ब्रेनवॉश करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होती. इस्लामी प्रथा, पोशाख आणि धार्मिक आचरणाबाबत मार्गदर्शन केले जात होते. त्यामुळे कार्यस्थळी दबाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

खानच मास्टरमाइंड असल्याचा संशय

आरोपींच्या आर्थिक व्यवहारांवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या बँक खात्यांची तपासणी सुरू असून, पगाराव्यतिरिक्त बाहेरील स्रोतांकडून निधी मिळत होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात निदा खान ही केवळ एचआर नसून, महत्त्वाचा दुवा आणि संभाव्य मास्टरमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कार्यसंस्कृती, महिला सुरक्षेचे प्रश्न आणि कॉर्पोरेट व्यवस्थेतील जबाबदारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nida Khan news |
Dhule Shirpur Highway accident: धुळे-शिरपूर महामार्गावर एसटीने दुचाकीला चिरडले, ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; आई-वडील जखमी

डॉ. शाहिद जैश-ए-मोहम्मदशी संबंधित

डॉ. शाहीन शाहिद ही १० नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मानली जाते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार ती फरिदाबाद येथील अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होती आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित गटाशी तिचे संबंध असल्याचा आरोप आहे.

एनआयए व यूपी एटीएसच्या तपासात ती 'व्हाइट कॉलर टेररिझम' नेटवर्कचा भाग असल्याचे समोर आले असून, डॉ. परवेझ व डॉ. मुजम्मिल यांच्यासह कट रचल्याचा संशय आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिला अटक करण्यात आली आहे. याच डॉ. शाहीन शाहिदशी नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील निदा खानचा संपर्क असल्याचे समोर येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news