Nandurbar Child Sexual Abuse Case | नंदुरबार बाललैंगिक शोषण प्रकरणात 3 पीडित मुले आली पुढे; पोलिसांच्या जाहीर आवाहनाला यश

Nandurbar Child Sexual Abuse Case | पोलिसांच्या जाहीर आवाहनाला यश
Child Abuse Case
Child Abuse CasePudhari
Published on
Updated on

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
बाललैंगिक शोषण प्रकरणात पोलीस तपासाला यश मिळाले आहे. माहिती देण्यासाठी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ११ ऑगस्टला तीन पीडित मुलांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क करत आपबिती कथन केली. यामुळे अत्याचार करणाऱ्या तरुणावर आणखी गुन्हे नोंदवले जाणार आहे.

Child Abuse Case
CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस 19 ऑगस्टला नाशिक दौऱ्यावर; भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीला लावणार हजेरी!

या प्रकरणाची भाजप प्रदेश महिलाप्रमुख चित्रा वाघ यांनी दखल घेतली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने दखल घेत या प्रकरणाची कारवाई केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवत आरोपीस शिक्षा करावी, ही मागणी व्हिडिओच्या माध्यमातून मांडली.

पीडित मुले आपबिती कथन करायला पुढे आले असले तरी त्या मुलांची अथवा त्यांच्या पालकांची माहिती बाहेर येऊ नये या दृष्टीने गोपनीयता राखली जात आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, नंदुरबारच्या रायसिंगपुरा भागातील चेतन कोळी हा तरुण अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण कर व्हिडिओ बनवतो आणि व्हायरल करण्याची धमक्या देत ब्लॅकमेल करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

Child Abuse Case
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेचा MNGL ला 'अल्टिमेटम'; 2 महिन्यांत गॅस जोडण्या पूर्ण करा, नाहीतर रस्ते खोदू देणार नाही!

त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पथक स्थापन केले होते.

आणखी पीडित येणार पुढे

शहर पोलिसांनी आरोपी चेतन कोळी याच्या मोबाईलमधून अत्याचाराच्या अनेक क्लिप्सची तपासणी सुरू केली असून, पीडितांची ओळख पटवणे चालू आहे. आतापर्यंत अनेक जण बळी पडल्याची बाब उघड झाली आहे. १० ऑगस्टला पोलिसांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यास यश आले आहे. पीडित मुलांची स्वतंत्र फिर्याद घेत गुन्हे नोंदवावेत की एकत्र गुन्हा नोंदवावा यावर निर्णय झालेला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करण्याचा पुरेपूर प्रयत्न असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news