Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादेवनगर, टाके हर्ष आणि देवडोंगरीच्या तिन्ही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे निलंबन

Trimbakeshwar | आर्थिक अनियमितता, कुचराई भोवली; सीईओ ओमकार पवार यांच्याकडून कारवाई
Trimbakeshwar
Trimbakeshwar
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात केलेल्या अचानक दौऱ्यात कामकाज कासूर आणि आर्थिक अनियमितता करणाऱ्या तिघा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महादेवनगर, टाके हर्ष आणि देवडोंगरी ग्रामपंचायतीमधील कारभारातील त्रुटिवर बोट ठेवत सीईओ पवार यांनी ही कारवाई केली.

Trimbakeshwar
Nashik Smart City | नाशिक स्मार्ट सिटीच्या 4.23 कोटींच्या अखर्चित निधीवरून केंद्र व राज्य शासनाचा जाब

सीईओ पवार यांनी शुक्रवारी (दि. २४) त्र्यंबकेश्वर तालुका अचानक दौरा करत ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. यामध्ये महादेवनगरचे ग्रामपंचायत अधिकारी मुरलीधर गावित यांच्यावर ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेसह मुख्यालय्यात अनधिकृततरीत्या अनुपस्थित राहणे, मासिक सभेला गैरहजर राहणे, लेखापरीक्षणासाठी शासकीय दप्तर उपलब्ध न करून देणे आणि कारणे दाखवा नोटीसीला मुदतीत खुलासा सादर न करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

टाके हर्षचे ग्रामपंचायत अधिकारी तुषार राजपूत यांच्यावर २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजवंदन न केल्याचा तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देवडोंगरीचे ग्रामपंचायत अधिकारी सतीश बच्छाव यांच्याविरुद्ध १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील आर्थिक अनियमितता, कारणे दाखवा नोटीसीला वेळेत खुलासा न देणे आणि कर्तव्यात कसूर करणे, या बाबीवरून कारवाई करण्यात आली आहे.

Trimbakeshwar
ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई

पंचायत समिती त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई केली असून, जि.प.च्या ग्रामपंचायत विभागाने यासंदर्भात स्वतंत्र निलंबन आदेश काढले आहेत.

त्र्यंबक पंचायत समितीलाही भेट

ओमकार पवार यांनी पंचायत समिती येथेही भेट देत कामकाजाची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी रविकांत सानप उपस्थित होते. पंचायत समितीस्तरावरून ग्रामपंचायतींच्या कामकाजावर ठेवण्यात येणारे नियंत्रण, विविध विकासकामांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला.

दुष्काळ निवारणाशी संबंधित कामे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमधील प्रगती यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रशासकीय दिरंगाई होऊ नये तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्या, अशा सूचना यावेळी पवार यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news