Fake work Order Case | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात बनावट 'वर्कऑर्डर'चे मोठे रॅकेट; नाशिक पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात!

Fake work Order Case | बनावट 'वर्कऑर्डर' प्रकरणी तिघे ताब्यात
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांसाठी विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या बनावट स्वाक्षरीने थेट ४०० ते ५०० कोटींच्या कामांची वर्कऑर्डर देत ठेकेदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मंगळवार (दि. ११) नाशिक पोलिसांनी जामनेर येथून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Arrested
Nashik Pothole Issue | नाशिक खड्डेप्रकरणी मनपा आयुक्तांचा मोठा दणका; शहर अभियंत्यांसह 36 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध कामांसाठी निविदा प्रक्रिया तसेच थेट अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने वर्कऑर्डर देऊन काही ठेकेदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार शुक्रवारी जळगाव येथे उघडकीस आला होता.

याबाबत संबंधित ठेकेदारांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केल्याने महाजन यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी जामनेर येथून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Arrested
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेचा MNGL ला 'अल्टिमेटम'; 2 महिन्यांत गॅस जोडण्या पूर्ण करा, नाहीतर रस्ते खोदू देणार नाही!

या प्रकरणात ठेकेदारांची किती आर्थिक फसवणूक झाली याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नव्हती. मात्र, आता चौकशी सुरू झाल्याने तपासात कोणाची किती फसवणूक झाली, तसेच संशयित कोण आहेत याबाबत लवकरच संपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित असलेला धुळे येथील एक शिक्षक (मूळ जामनेर) घटनेची माहिती मिळताच फरार झाल्याची चर्चा आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जळगाव जिल्ह्यात याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news