विकृतीचा कळस : पशू अत्याचारी वृत्ती हा मानसिक आजारच!

'झूफेलिया' : संशयितांना मानसिक उपचारांची गरज : तज्ज्ञांचे निरीक्षण
पॅराफेलिया
मुक्या जणावरांवरही लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या विकृतीला 'पॅराफेलिया असे म्हटले जाते. Image source - X
Published on
Updated on
नाशिक : निल कुलकर्णी

जिल्ह्यात लासलगाव आणि सातपूर येथे प्राण्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना या निरोगी मनाच्या व्यक्तींकडून होऊच शकत नाहीत. मनोरुग्णाकडूनच ही विकृती बाहेर पडते, असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवले आहे. अशा व्यक्तींना मानसिक आजाराची गरज असून योग्य उपचार आणि समुपदेशनातून मनोरुग्णांचे पुनर्वसन ‌करावे, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (A mind-numbing series of atrocities on girls and women)

राज्यासह संपूर्ण देशात मन सुन्न करणाऱ्या बालिका आणि महिलांवरील अत्याचाराची मालिका सुरु असतानाच आता मुक्या जणावरांवरही लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या विकृतीला 'पॅराफेलिया असे म्हटले जाते. हा मानसिक आजार असून या संकल्पनेत प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या विकृतीला 'झूफेलिया' असे संबोधले जाते. या मनोआजारात मानवाला पशूंसोबत 'समागम' करण्याची अनिवार इच्छा होते. असे रुग्ण भावनिक, शारिरीक अपरिपक्वता असणारे असतात. प्राण्यांना त्रास देऊन त्यातून आनंद घेण्याची वाईट 'वृत्ती'हे रुग्ण करतात. रुग्ण मनोआजारांनी ग्रस्त असून त्यांच्याच प्रचंड न्यूनगंड असून ते शारीरिक मानसिक आत्मविश्वास गमवून बसतात. लहानपणी त्याच्यावर अत्याचार किंवा आगळीक झालेली असू शकते. यासह वर्तन दोष आणि कामभावनांचे व्यवस्थापन न जमणे, इंटरनेटवरील, 'ओटीटी' प्लॅटफॉर्मवरील कामभावना चाळवणारे 'कंटेंट' त्यामुळे अशा रुग्णांची कामभावना अनियंत्रित, विकृत आणि अतिशय तीव्र स्वरुपाची असते, असे निरीक्षण तज्ज्ञ नोंदवतात. कायद्याच्या शिक्षेसह या रुग्णांवर याेग्य मनोउपचारासह त्यांचे पुनर्वसन करावे, असेही मत मानसतज्ज्ञांनी व्यक्त केले.

पॅराफेलिया
किती ही अधोगती! पूज्य गायीवर अनैसर्गिक अत्याचार; व्हिडीओ देखील बनवला

मनुष्यांला चुक आणि बरोबर या गोष्टी योग्यपणे कळतात. मात्र, प्राण्यांवर अत्याचार करणारे रुग्ण हे अशी विवेकबुद्धी हरवून बसलेले असतात. अशा गाेष्टी करणारे लाखांतून एखादा असतो. मात्र, इंटरनेटरवरुन २४ तास आदळणारे 'कामूक' कंटेंट यामुळे अशा रुग्णांवर अधिक प्रभाव होऊ शकतो. असे कंटेंट सहज उपलब्ध होतात त्यामुळे अशा विकृतीत उफाळून येऊन अत्याचार होतात. अशा रुग्णांवर योग्य उपचार व्हावे. असे विचित्र वर्तन करणाऱ्यांवर 'मॉनेटरींग' करणेही गरजेचे आहे.

डॉ. अर्पणा चव्हाण, मानसशास्त्रज्ञ, पुणे.

पॅराफेलिया
Nashik Crime News | मोकाट जनावरावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

'झूफेलिया' हा आजार आहे. याबद्दल लोकांमध्ये जागृती नाही. यावर योग्यवेळी उपचार झाले असते तर कदाचित असे काही घडलेच नसते. त्यामुळे अशा विचित्र वर्तन असणाऱ्यांचे 'मॉनिटरींग' त्याच्या कुटुबियांनी, मित्र परिवाराने करायला हवे. या कृत्याची शुटींग करुन त्यांना समाज माध्यमांवर पाेहचवणे देखील चुकीचे आहे. त्याच्यावरही उपचाराची गरज आहे. अशा कृत्यातून दोन समाजात तेढ निर्माण होऊन समाजआरोग्य धोक्यात येऊ शकते. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन उपचार झाले पाहिजे.

प्रा. आसावरी देशपांडे, समाज अभ्यासक, नाशिक.

झूफेलिक रुग्णांच्या मेंदूमध्ये काही रासायिनक बदल झालेले असतात. डोमामिन नावाच्या संप्रेरकाची मेंदूच्या काही ठाराविक भागामध्ये वाढ झालेली असते. याशिवाय मेंदूतील 'टेम्पोरल लोब' ला इजा झालेला रुग्णही अशी विकृती करतो. उत्तेजक, अमलीपदार्थाचे सेवनानेही कामभावनाना अनियंत्रीत करु शकतात. त्यातून हे घडते. पशुसोबत संबंध केल्याने लैगिंक आजार बरे होतात, असेही गैरसमज लोकांमध्ये आहेत.

डॉ. महेश भिरुड, मनसोपचार तज्ज्ञ, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news