Nashik Crime News | मोकाट जनावरावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

लासलगाव येथील प्रकार
Arrested
मोकाट जनावरावर अनैसर्गिक अत्याचार ; तरुणाला अटक FiIle Photo
Published on
Updated on

लासलगाव : नाशिक येथील सातपूरमध्ये एका तरुणाने गायीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच लासलगाव येथे अशीच घटना समोर आली आहे. येथे सार्वजनिक रस्त्यावर बसलेल्या मोकाट जनावरावर अनैसर्गिक अत्याचार करून त्यांना मारहाण करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दिली.

Arrested
किती ही अधोगती! पूज्य गायीवर अनैसर्गिक अत्याचार; व्हिडीओ देखील बनवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील विद्यानगर परिसरातील रस्त्यावर शनिवारी (दि. 31) पहाटे साडेतीनच्या सुमारास संशयित कुंदनकुमार शत्रुघ्न महतो (22, रा. गणेशनगर, लासलगाव) हा अर्धनग्न अवस्थेत उभा राहून जमिनीवर बसलेल्या मोकाट जनावरासोबत लगट करून त्यास एका हाताने क्रूरपणे मारहाण करून वेदना होईल असे कृत्य करताना आढळून आला. याबाबत पद्माकर प्रभाकर साखरे (रा. लासलगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत प्राण्यांना छळ प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निचळ करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news